आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक नेत्यांनी आतापासूनच शडू ठोकण्यास सुरूवात केली आहे. ऐक्य मंडळाने स्वबळाचा नारा दिल्या नंतर आता सदिच्छा मंडळानेही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या मंडळाच्या नेतेपेदी राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत सदिच्छा मंडळाच्या महाआघाडी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणारे ऐक्य मंडळाने स्वबळावर लढण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली होती. आता सदिच्छा मंडळानेही स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने बँकेच्या राजकारणात रंगत वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वात जुने असलेल्या सदिच्छा मंडळाने आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून मेळाव्यांतून आवाहन सुरू केले आहे. निवडणूक नियोजन मेळावा नगर येथे नुकताच झाला. या मेळाव्यात रवींद्र पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदिच्छा मंडळाच्या नेतेपदी राजेंद्र शिंदे यांची एक मतांने निवड करण्यात आली. शिंदे यांनी सदिच्छा मंडळ सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन ढवळे होते. यावेळी विनोद फलके, पांडुरंग काळे, बाळासाहेब साळुंके, संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, रहिमान शेख, बबन गाडेकर, भास्कर कराळे, चंद्रकांत मोरे, राजाभाऊ बेहळे, बाबा आव्हाड, पुरुषोत्तम आंधळे, नवनाथ तोडमल, भाऊसाहेब कबाडी, बाळासाहेब साळुंके, बबन गाडेकर, बाळासाहेब डमाळ, गणेश मोटे, महादेव गांगर्डे, विनोद फलके, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.