आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुरूडगाव रोडवरील समर्थनगर टाकीत बूस्टर पंप बसवून त्यात पाणी सोडण्यात आले आहे. वसंत टेकडी येथील जलकुंभातील पाण्याची पातळी कमी असली, तरी बूस्टर पंपाद्वारे समर्थनगरची टाकी भरण्यास मदत होणार आहे. अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जातील व नगरकरांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे १२ वर्षानंतर ही टाकी कार्यान्वित होणार आहे. बुस्टर पंपाद्वारे पाणी सोडण्यात आल्यावर आमदार जगताप यांनी पाहणी केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अविनाश घुले, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, संजय चोपडा, निखिल वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.