आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सहकारी पतसंस्थाची मातृसंस्था असलेल्या अगस्ति ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सन २०२२-२७ पंचवार्षिक कालावधीसाठीची संचालक मंडळाची निवडणूक अगस्ति साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. निवडणुक रिंगणात निवडून द्यायच्या १३ जागांसाठी फक्त १३ अर्जच शिल्लक राहील्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांनी दिली.
अकोल्यातील अगस्ति ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीसाठी २५ डिसेंबर रोजी मतदान होणार होते. पण मंगळवारी (१३ डिसेंबर) उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम मुदतीत इच्छुक २६ उमेदवारांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी १३ जणांनी आपले १६ अर्ज माघार घेतले.
नवनिर्वाचित संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून अगस्ति साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सीताराम पाटील गायकर (मोग्रस), अक्षयकुमार सदाशिव पोखरकर (कोतूळ), भाऊसाहेब पाटीलबुवा बराते (वाघापूर), शरद कारभारी चौधरी (आंभोळ), अशोक भाऊसाहेब देशमुख (उंचखडक बुद्रुक), दत्तात्रय नामदेव धुमाळ (अकोले), गणेश एकनाथ पापळ (धामणगाव आवारी), गुलाब संतु आरोटे (ब्राह्मणवाडा) हे ८ उमेदवार बिनविरोध निवडणूक आले.
तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून शिवाजी भिवंजी गोंदके (राजूर) यांची वर्णी लागली. भटक्या जाती विमुक्त जमाती मतदारसंघातून अकोल्यातील ख्यातनाम उद्योजक मारुती यादवराव भिंगारे हे बिनविरोध निवडून आले आहेत. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून शिवराम रामनाथ भोर (धामणगाव पाट), महिला राखीव मतदारसंघातून सुरेखा राजेंद्र नाईकवाडी व पद्मा एकनाथ गायकवाड या बिनविरोध निवडुन आल्या आहेत.
या निवडणुकीत संचालक होण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेल्यातील माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, माजी उपाध्यक्ष तुकाराम उगले, गंगाधर गाजरे, वसंत धुमाळ, प्राचार्य बाबासाहेब देशमुख, प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे, रघुनाथ नवले, लता भिमाजी वाकचौरे, हिराबाई संतोष नाईकवाडी, रघुनाथ नवले व उद्योजक अनिलकुमार कोळपकर यांना अगस्तित संचालक म्हणून निवडून जायच्या इच्छेवर पाणी सोडावे लागले.
या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून बिनविरोध निवडणूक आलेले अगस्ति साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोक देशमुख यांची वर्णी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून व अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शरद चौधरी किंवा उद्योजक मारुती भिंगारे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.