आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘अगस्ति’ची चाके आता आम्ही बंद पडू देणार नाहीत व तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांंचा ऊस तोडून वेळेवर गाळप होईल व ऊसदर समाधानकारक देऊ, हा शब्द व आत्मविश्वास या ऐतिहासिक निर्णयातून समृद्धी मंडळ सर्वांना अभिवचन देत आहोत, याचा पुनरुच्चार अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांंनी पत्रकार परिषदेत केेेेला.
अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत गायकर बोलत होते. पत्रकार परिषदेस आमदार डॉ.किरण लहामटे, लोकनेते अशोक भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले, अमित भांगरे, मीनानाथ पांडे, कचरूपाटील शेटे, रामनाथबापू वाकचौरे, अॅड, शांताराम वाळूंज, काॅम्रेड कारभारी उगले, मारूती मेंगाळ, गुलाब शेवाळे, भानुदास तिकांडे, अॅड् वसंत मनकर, विजय वाकचौरे, अशोक देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, विक्रम नवले, विकास शेटे, राजेंद्र कुमकर, बाळासाहेब ताजणे, परबत नाईकवाडी, सुरेश गडाख, सुरेश नवले, चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, शरद चौधरी, प्रा. चंद्रभान नवले आदी उपस्थित होते.
गायकर म्हणाले, तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साडेचार लाख मेट्रिकटन ऊस गाळपाचा प्रश्न आहे. जिल्हा बँकेवर अकोल्यातून मधुकरराव नवले, अमित भांंगरे आणि मी स्वतः प्रतिनिधित्व करतो आहोत. कोणत्याही परिस्थितीत अगस्ती कारखाना आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून चालवूच ही आमची इच्छाशक्ती होती व ती तिघांची जबाबदारीही ठरते. हाच विश्वास आमच्या शेतकरी बांधवांना व ऊस उत्पादकांना तालुक्यातील सर्व समृद्धी मंडळाचे नेते देत होते. केंद्र वा राज्य सरकार किंवा भाजप पक्षाला जिल्हा बँकेच्या कर्ज मंजुरीत हस्तक्षेप होत नसतो. तरीदेखील काही लोक भूलभुलैया करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सभासदांची दिशाभूल करीत होते.
प्रास्ताविक व स्वागत जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले यांनी केले. ते म्हणाले, अगस्तिचा गाळप हंगाम प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून शंभर टक्के यशस्वी करण्याबाबत आवश्यक कर्ज उपलब्धतेवर व उपाययोजनांवर भाष्य केले. अशोक भांगरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर नविन सोडतीत गंडांंतर आल्याचा आरोप केला. हा प्रकार पेसा कायद्यांचे उल्लंघन असल्याचा आरोप करून त्यावर हरकती घेण्याचे सूूचित केले.
आरोप केल्यास जशास तसे उत्तर देऊ
देशात धर्मनिरपेक्षता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खासदार, आमदार कसे मतदान करतात, संविधानातील हे अधिकार माजी मंत्र्यांना माहिती नसल्यानेच मी आदिवासी असून आदिवासी महिलेला मतदान न केल्याचा आरोप ते माझ्यावर करीत आहेत. त्यांच्या राजूर गावात त्यांच्यासमोरच भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आदिवासींचा अपमान व उपमर्द केलाय. त्याबद्दल पिचड पितापुत्रांना खेद वाटत नाही. पिचड यांच्या याचा आदर करतोय म्हणून मी गप्प आहे, यापुढे असे जातीयवादी व खोटेनाटे आरोप केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आमदार लहामटे यांनी दिला.
१ ऑक्टोबरला गाळप हंगाम सुरू करणार
मुकादम, ट्रक व ट्रॅक्टर वाहतूकदार आणि मुख्यत्वे ऊसतोड मजुरांच्या १०० टोळ्यांच्या संपर्कात अाहे. कारखान्यातील अंतर्गत मशिनरीची देखभाल व दुरुस्तीची कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करायची आहेत. त्यावरील उपाययोजना करून १ आॅक्टोबरला गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी चुकीच्या प्रचारास व भूलथापांना बळी पडू नका. अगस्तिचा हंगाम नियोजनानुसार वेळेवर ऊसतोड करून समाधानकारक ऊसदर देऊन शंंभर टक्के पूर्ण करणार, असे गायकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.