आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२७ निवडणुकीसाठी सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती. यादिवशी अर्ज दाखल करण्यास सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सभासद व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत उत्पादक अकोले, आगर, इंदोरी, देवठाण, कोतूळ गटातील एकूण १५ व महिला राखीव २ जागांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त व जाती जमाती, सहकारी संस्था व सोसायटी गटातील प्रतेकी एक जागांसह संचालक मंडळातील एकूण २१ जागांवर २८७ अर्ज दाखल झाले.
अगस्ति साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करताना भाजपचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निष्ठावंत तथा जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे यांनी पिचड पितापुत्रांना सोडचिठ्ठी दिल्याचे दाखवून दिले. हा प्रकार म्हणजे पिचड पितापुत्रांसाठी धक्का मानण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ जूनला मुंबईत कैलास वाकचौरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित होता, पण १ जूनला वाकचौरे यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने तो कार्यक्रम लांबणीवर पडला. वाकचौरे यांनी सोमवारी अर्ज महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल केला. वाकचौरे हे पिचड यांचे उजवे हात समजले जात होते पण त्यांना डावलून अर्ज दाखल केल्याने आपण पिचड पितापुत्रांची साथ सोडल्याचे कृतीतून दाखवून दिले.
दीड दोन वर्षांपासून अगस्ति साखर कारखान्यात व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्याबाबत नारा दिलेले निवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख व ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी त्यांच्याबरोबर व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्यात सोबत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्यात परिवर्तन घडले. त्यांनी व्यवस्था परिवर्तनवाद्यांना सोडचिठ्ठी देऊन शुक्रवारी व पुन्हा सोमवारी समर्थकांसह आमदार डॉ. लहामटे व गायकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून उमेदवारी करण्याचे सूचित करून अर्ज दाखल केले. अकोल्यात सर्वप्रथम व्यवस्था परिवर्तनाची आस दाखवताना, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही उमेदवारी करणार नाहीत, असे देशमुख यांनी सभासदांना आश्वासित केले होते, मात्र अर्ज दाखल करण्याच्या निमित्त त्यांना आपल्याच आश्वासनाचा विसर पडला असल्याची चर्चा होत आहे. सोमवारी दशरथ सावंत हे निवासस्थानापासून ते जिल्हा बँकेत पारंपरिक वाद्याच्या गजरात उपस्थित झाले.सावंत यांच्यासह बी.जे.देशमुख, बाजीराव दराडे, मारूती मेंगाळ, हिरामण भोत व समर्थक सभासदांनी मिरवणुकीत घोषणा देत शक्तिप्रदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.