आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी तंत्रज्ञान:शेतीला चालना मिळण्यासाठी कृषी प्रदर्शन भरवणे आवश्यक; आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तम शेती हे आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनानुसार शेती करण्यासाठी तसेच नवीन तरुण शेतकरी शेतीत येण्यासाठी कृषी प्रदर्शनाची आवश्यकता आहे. येथून शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

नगर येथे औरंगाबाद रस्त्यावर मधुबन हाॅटेल शेजारी जलसमृद्ध शेतकरी उत्पादक कंपनी, अॅग्रोवार्ता लॅबतर्फे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रहार संघटनेचे नेते संतोष पवार, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, नगरसेवक निखिल वारे, संत ज्ञानेश्वर साखर कारखान्यचे संचालक काकासाहेब शिंदे, जांभेकर मॅडम, जलसमृद्ध शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नितीन शिंदे, अॅग्रोवार्ता लॅबचे भाऊसाहेब मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, शेतीकडे अलिकडच्या काळात लोक पुन्हा चांगल्या प्रकारे अकर्षित होत आहेत. दर्जेदार माल उत्पादन, शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होत आहेत. मात्र, नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेती यशस्वी करता येते हे अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी दाखवून दिले. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी प्रदर्शनाची गरज आहे. शेतकरी उत्पादक कंपन्याकडून शेतकरी विकासासाठी, तरुण शेतकऱ्यांनी शेतीत येण्यासाठी काम केले जात आहे. सेंद्रीय व रेसिड्युफ्री शेतमाल विक्री करण्यासाठी जलसमृद्ध शेतकरी उत्पादक कंपनी पुढाकार घेत असल्याचा उपक्रम चांगला आहे. यावेळी संग्राम जगताप यांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व लोकांशी चर्चा केली. नितीन शिंदे, भाऊसाहेब मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

१४ मे पर्यंत चालणार प्रदर्शन
नगर येथे औरंगाबाद रस्त्यावर मधुबन हॉटेल शेजारी जलसमृद्ध शेतकरी उत्पादक कंपनी, अॅग्रोवार्ता लॅबतर्फे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन ११ ते १४ मे पर्यंत चालणार आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये सुमारे विविध स्टॉल थाटण्यात आले आहेत. शेतमाल ते विविध तंत्रज्ञानाचे हे स्टॉल आहेत. नगर शहरवासियांसाठी हे कृषी प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...