आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:उत्पन्न वाढीसाठी शेतीत वैविध्यपूर्णता आणणे गरजेचे; डॉ. सिंह यांचे प्रतिपादन

राहुरी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमध्ये वैविध्यपूर्ण बदल करणे तसेच दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय गरजेचे असल्याचे प्रतिपादन अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंह यांनी केले.

नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पास शास्त्रज्ञा समवेत दिलेल्या भेटीत ते बोलत होते. लाखन सिंह म्हणाले, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी छोटे छोटे व्यवसाय सुरू करून कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.यावेळी कनगर येथील राजेंद्र वरघुडे यांच्या एकात्मिक शेती पद्धती, शेतमजूर महिला बचत गटाचा दालमिल प्रकल्प, तांभेरे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी गोकुळ मुसमाडे यांची डाळिंब बाग,ताराचंद गागरे यांच्या परसबागेतील कुक्कुटपालन,कानडगाव येथील राधाकृष्ण गागरे यांच्या जनावरांचा मुक्त गोठा कानडगाव येथील मधुकर गागरे यांच्या एकात्मिक शेतीपद्धतीस शास्रज्ञांनी भेटी दिल्या. या कार्यक्रमास अटारीचे पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे,प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, वरीष्ठ संशोधन सहयोगी सुप्रिया पाटील, अनिता देशमुख, कानडगाव येथील शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.प्रकल्प भेटीचे आयोजन करण्यासाठी प्रकल्प सहाय्यक किरण मगर व राहुल कोऱ्हाळे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख यांनी, तर आभार प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...