आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने झोडपले:शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, जिल्हा रुग्णालयासमोरील वृक्ष उन्मळून पडल्याने रुग्णसेवा विस्कळीत

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादळामुळे शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील वृक्ष उन्मळून पडल्याने रुग्णसेवा काही वेळ विस्कळीत, शहरात ठिकठिकाणी फ्लेक्सचे नुकसान

अहमदनगर जिल्ह्याला शनिवारी (8 एप्रिल) ला रात्री 8 वाजता वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने झोडपून काढले.या पावसात अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील वृक्ष वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडल्याने आरोग्यसेवा काही वेळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, तातडीने अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन पडलेले वृक्ष बाजूला करून सेवा पूर्ववत सुरू केली.

गारपीटीच्या पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून, वादळामुळे शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळील मोठा वृक्ष उन्मळून पडला. त्यानंतर तातडीने शासकीय रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे यांनी अग्निशामक दलाशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.

त्यानंतर अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी घटनास्थळी कर्मचाऱ्यासह धाव घेऊन अथक प्रयत्नानंतर पडलेला वृक्ष बाजूला केला आणि आरोग्यसेवा पूर्वरत सुरू केली. वादळी वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी फ्लेक्सचे नुकसान झाले.

पावसाची हजेरी

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली असून, काही भागात या पावसामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी देखील विजेच्या कडकडट्यांसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानातही माेठी घट झाली असून, वातावरणात गारवा तयार झाला हाेता.

पिकांचे नुकसान

गेल्या महिन्यात नगर शहरासह जिल्ह्यात अवकाळी व गारपीटीचा पाऊस झाला हाेता. त्यामुळे हातात आलेल्या गव्हाच्या पिकाचे तसेच हरभरा, मका, ज्वारी सह फळबागांचे माेठे नुकसान झाले हाेते. जिल्ह्यात साडे हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते. शुक्रवारी रात्री विजेच्या कडकडट्यांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला हाेता. अनेक ठिकाणी वादळामुळे नुकसान झाले आहे.