आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०१४ ते २०१९ या काळात नगर अर्बन बँकेच्या संचालक व अधिकाऱ्यांनी बँकेची, खातेदारांची व सभासदांची सुमारे १५० कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, बँकेचे अधिकारी व मुख्य शाखेचे व्यवस्थापक, आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.
सन २०१५ पासून नगर अर्बनची मुख्य शाखा व इतर कार्यालयांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे सभासदांना लाभांश व ठेवीदारांना त्यांचा परतावा, ठेवीची रक्कम व त्यांच्या इतर खात्यातील रकमा परत मिळत नाहीत. बँकेच्या संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, काही कर्जदार व इतर संबंधित व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून बँकेचे नुकसान केले आहे.
गांधी यांनी याप्रकरणी प्रशासक, रिझर्व बँक, पोलिस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना आदेश देण्याची मागणी केली होती. त्यांनतर डॉ. नीलेश शेळके व इतर डॉक्टरांचे २३ कोटी ९० लाखांच्या कर्जप्रकरणी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विविध प्रकारची नियमबाह्य, बनावट कर्जप्रकरणे करून, तसेच सोने तारण व्यवहारात बँकेची एकूण सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याला जबाबदार असलेल्या काहींची नावेही त्यांनी फिर्यादीत नमूद केली आहेत. त्यावरुन कोतवाली पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचे निकटवर्तीय आशुतोष सतीश लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट व बँकेचे तत्कालीन मुख्य शाखा व्यवस्थापक अच्युत बल्लाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.