आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Ahemadnagar BJP District Presidentप्रदेश प्रवक्ते भंडारी कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार‎, भाजप जिल्हाध्यक्ष निवड‎

राजकारण:प्रदेश प्रवक्ते भंडारी कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार‎, भाजप जिल्हाध्यक्ष निवड‎

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नगर जिल्हा‎ भाजपचे तीनही जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार अाहे.‎ नवीन जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची मते व‎ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी‎ ११ व १२ मे रेाजी भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी‎ नगरमध्ये येणार अाहेत.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी‎ केलेल्या चर्चेनंतर त्याचा अहवाल तयार करून ते‎ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे‎ सादर करणार आहेत. भंडारी यांच्या दौऱ्यात शहरासह‎ उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी कुठल्या‎ नावाची शिफारस जाणार याकडे भाजप कार्यकर्त्यांचे‎ लक्ष लागले आहे.‎

शहराध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात?

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या ‎पार्श्वभूमीवर उमेदवार व पक्ष प्रमुख यांच्या समन्वय ठेवण्याची मुख्य जबाबदारी जिल्हाध्यक्षांवर असते.‎ त्या दृष्टीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान‎ परिषदेचे आमदार कथा प्रदेश प्रवक्ते राम शिंदे,‎ आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते‎ यांची जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीत भूमिका‎ महत्त्वाची राहणार आहे.‎ बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या प्रदेश‎ कार्यकारिणीत विद्यमान शहराध्यक्ष भैय्या गंधे यांचे‎ नाव नसल्याने शहराध्यक्ष पदाची माळ पुन्हा गंधेंच्या‎ गळ्यात पडण्याची चिन्हे असली तरी माजी महापौर‎ बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी, वसंत लोढा‎ यांचीही नावे चर्चेत आहेत.

विखे गटाकडून नावे येण्याची शक्यता

शिवाय विखे गटातूनही‎ काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणचे‎ जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे प्रदेश चिटणीस झाल्याने‎ त्यांच्या जागेवर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी‎ अनेकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यापूर्वी‎ जिल्हाध्यक्ष पद हे शेवगावला मिळाल्यामुळे‎ दक्षिणेतील अन्य तालुक्यांमधूनच जिल्हाध्यक्ष पद‎ दिले जाणार आहे. विशेषतः हा "ओबीसी''समाजाची‎ मोठी वोट बँक दक्षिणेत असल्यामुळे जिल्हाध्यक्षपद‎ ओबीसीकडे जाण्याची शक्यता आहे.‎

१६ मे पर्यंत नावे जाहीर होणार‎

जिल्हाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करून‎ घेण्यासाठी तसेच मते जाणून घेण्यासाठी गुरुवार,‎ शुक्रवार हे दोन दिवस भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी‎ नगर शहरात येणार अाहेत. निवडीबाबतचा अहव ाल‎ प्रदेशाध्यक्षांकडे सादर केल्यानंतर १६ मेपर्यंत नवीन‎ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणार आहेत.‎