आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसी पोलिसांची कारवाई:नगरमधून साडेसात टन रक्तचंदनाचा साठा जप्त; एका जणाला अटक

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील एमआयडीसी परिसरातून सुमारे साडेसात टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे सव्वातीन कोटी रुपये किमतीचा हा माल असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान एकास अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

एमआयडीसी हद्दीत सदाशिव झावरे यांच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आठरे यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह छापा टाकून खात्री केली. यात गोडाऊनमध्ये बटाट्याच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले साडेसात टन रक्तचंदन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे तीन कोटी 25 लाख रुपये किंमत आहे. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...