आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचा चक्काचूर!:अहमदनगरच्या श्रीगोंद्यात भीषण अपघात, कारची उसाच्या ट्रेलरला धडक, तीन मित्रांचा तो प्रवास ठरला अखेरचा

अहमदनगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आपल्या मित्राला काष्टी येथे सोडण्यासाठी हे तिघे कारने निघाले होते. मात्र या तिघांवर काळाने घाला घातला आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

या घटनेत जण मित्रांचा जीव गेला असून, त्यांचे नाव राहुल सुरेश आळेकर (वय 22, रा श्रीगोंदा), केशव सायकर (वय 22, रा. काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय 18, रा. श्रीगोंदा) असे आहे. केशव सायकर हा श्रीगोंदा येथे आला होता. त्याला पुन्हा काष्टीला सोडण्यासाठी शनिवारी उशिरारात्री हे तिघे कारने निघाले होते. त्यातदरम्यान रस्त्याने एक उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर देखील जात होता. कारमधील चालकाला याचा अंदाज न आल्याने कार ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीमध्ये घुसली. त्यामुळे ट्रॅक्टरला जोरात धडक बसली. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली आहे.

अपघात कुठे झाला?
राहुल आळेकर, केशव सायकर आणि आकाश खेतमाळीस हे तिघेजण कारमधून प्रवास करत होते. मध्यरात्री श्रींगोदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्या जवळ उसाच्या ट्रेलरला धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळतात अनन्या हॉटेलमधील व्यक्तींना घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढले. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच समोर आले.

तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी राहुल याला श्रीगोंद्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तीन तरुण मुलांचा अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात देखील हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...