आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खटल्याचा निकाल पाच महिन्यात:अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी निंबळाकर यास जन्मठेप

कर्जत18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा श्रीगोंदे येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली. मोहन जयसिंग निंबाळकर (५५, रा. पाटेवाडी ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. या खटल्याचा निकाल अवघ्या पाच महिन्यात लागला.

६ ऑगस्ट २०२१ रोजी अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी रानात गेली असता तेथे आरोपी मोहन निंबाळकर याने या पीडित अल्पवयीन मुलीस पैशांचे आमिष दाखवून तिच्या शेळ्या तो राहत असलेल्या भाडयाचे राहते घरासमोरील झाडाला बांधल्या. मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तुझ्या आई बापाला मारून टाकून, अशी धमकी आरोपीने मुलीला दिली.

६ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीच्या बहिणीने ही घटना पाहून तिच्या आईला सांगितले. पीडित मुलीची आई ही पीडित मुलीस घेऊन कर्जत पोलिस ठाण्यात आली असता पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व महिला पोलिस नाईक जयश्री गायकवाड यांनी या घटनेबाबत अल्पवयीन मुलीकडे प्राथमिक चौकशी केली असता पीडित मुलीवर अत्याचार झालेल्या गुन्ह्याची उकल झाली.

मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात बलात्कार,बाल लैंगिक अत्याचार ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये निंबाळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमे असल्याने गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला अण्णासाहेब जाधव यांनी तपास घेतला.

आरोपीचा पोलीस स्टाफ मदतीने शोध घेऊन आरोपीस अटक केली. व ६०दिवसांत दोषारोपपत्र श्रीगोंदे येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. हा खटला न्यायालयात जलद गतीने चालून ३१ रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश शेख यांनी आरोपी मोहन निंबाळकर यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून जी. के. मुसळे यांनी काम पाहिले.

कोर्ट पैरवी अंमलदार एन. एस. दरेकर यांनी उत्तमरित्या काम पाहिले. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. एस. के. पाटील यांनी कामकाज पाहिले. पोलिस अंमलदार संतोष धांडे ,संतोष साबळे यांनी तपासकामी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मदतनीस म्हणून कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...