आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त ॲड. सुहास आहेर, उपाध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे, तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. सुनंदा वाणी यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. ॲड. आहेर यांची सलग चौथ्यांदा अध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
थोरात साखर कारखाना अतिथिगृहावर मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सेक्रेटरीपदी ॲड. मोहन फटांगरे, ॲड. अमोल घुले, खजिनदार ॲड. तात्यासाहेब गुंजाळ, तर सदस्यपदी ॲड. प्रशांत गुंजाळ, ॲड. अविनाश गोडगे, ॲड. किरण रोहम, ॲड. प्रशांत गव्हाणे, ॲड. मामा पवार आदींच्या निवडी करण्यात आल्या आहे. अध्यक्ष ॲड. आहेर यांनी ४ वर्षात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे पाठपुरावा करून बार असोसिएशनसाठी २१ गुंठे जागा, तर कोरोनात महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलकडून ३० लाखाचा निधी मिळवला. सतत बार असोसिएशनच्या हिताचे निर्णय घेतले. विकास कामासाठी पाठपुरावा केला. आता वकिलांच्या चेंबरसाठी पाच मजली इमारत, पार्किंग शेड, फर्निचर व सुशोभीकरणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. आहेर यांनी सांगितले. निवडीबद्दल मंत्री थोरात, आमदार डॉ. तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्री थोरात, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, प्रतापराव ओहोळ, ॲड. अरविंद गणपुले, ॲड. बापूसाहेब गुळवे, ॲड. अरुण आहेर, ॲड. डी. आर. वामन, ॲड. संजय दीक्षित, ॲड. अतुल आंधळे, ॲड. सदाशिव थोरात, ॲड. प्रदीप मालपाणी, ॲड. विवेक बोऱ्हाडे, ॲड. नईम इनामदार, ॲड. अशोक हजारे, ॲड. मधुकर गुंजाळ यांनी अभिनंदन केले.
उपाध्यक्षपदी ढोमसे
तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुहास आहेर व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना मंत्री बाळासाहेब थोरात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.