आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांचे मुले प्रशासनात आली व बहुजन वर्गातील मुले शिक्षक झाली. मात्र, शेतकरी जसा आहे, तसाच आहे. ही परिस्थिती बदलणे कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात असल्याचे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ डॉ. नानासाहेब पवार सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. डॉ. शरद गडाख म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक सुदृढ होऊन प्रत्येकाने शिस्त बाळगली पाहिजे. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. डॉ. प्रमोद रसाळ यांनी विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरोटे, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. विजू अमोलिक, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड तसेच कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.