आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Ahmadnagar District Primary Teachers Bank Election Aikya Mandal Will Contest Elections On Its Own; The Role And Policy Of The Bank Will Be Announced Soon

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक:ऐक्य मंडळ स्वबळावर निवडणूक लढवणार; बँके विषयक भूमिका व धोरण लवकरच जाहीर करणार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • District Primary Teachers Bank Election Aikya Mandal will contest elections on its own; The role and policy of the bank will be announced soon

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मागील निवडणुकांत सदिच्छा मंडळाच्या महाआघाडी एक्सप्रेसमध्ये सहभागी झालेले ऐक्य मंडळाने आगामी निवडणुकीत मात्र, स्वबळावर लढण्याची घोषणा राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी केली आहे. नगरमध्ये झालेल्या एका बैठकीत ऐक्य मंडळाने हा निर्णय घेतला.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मतदारांची यादी अंतिम झाली असून कोणत्याही क्षणी निवडणूक घोषीत होऊ शकते. यापार्श्वभूमीवर बँकेच्या राजकारणातील सक्रीय संघटना व मंडळांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित ऐक्य मंडळाची प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा बैठक नुकतीच एमआयडीसीत जिमखाना येथे मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शिक्षक संघाचे राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे , राज्यउपाध्यक्ष सुनिल जाधव, राज्यसंघटक राजेंद्र निमसे, सर्जेराव राऊत, संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, राजकुमार शहाणे, सुनिल शिंदे, शरद वांढेकर, विलास लवांडे, भाऊसाहेब घोरपडे ,शिवाजी ढाकणे, ज्ञानदेव कराड, प्रदीप चक्रनारायण, रज्जाक सय्यद, संदीप शेळके आदी उपस्थित होते.

शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न सोडविल्याने सभासद मोठ्या प्रमाणात मदत करतील, त्यामुळे शिक्षक बँकेची आगामी निवडणूक ऐक्य मंडळाने स्वबळावर लढवावी असा, निर्धार केल्याची माहिती संघटनेचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी बैठकीत दिली. या निर्णयावर सर्वाचे एकमत झाले. निवडणुकीसंदर्भातील धोरण आणि त्याच उद्देशाने करावयाची अंमलबजावणी याबाबत चर्चा झाली.

कोणत्याही मंडळावर टीका करणार नाही

कोणत्याही मंडळावर अथवा संघटनेवर टीका टिप्पणी न करता, आपण राज्यस्तर व जिल्हा स्तरावरील केलेल्या संघटनात्मक कामाचा व प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत घेतलेल भूमिका सभासदांसमोर मांडणार आहे. लवकरच जिल्हास्तरीय मेळाव्याचे नियोजन करून शिक्षक सभासदासमोर बँके विषयक भूमिका व धोरण जाहीर केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...