आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोंगरघाट माथ्यावर सुमारे उभारण्यात येत असलेल्या १ कोटी ३० लाखांच्या श्री रामेश्वर बायोडायव्हरर्सिटी पार्क निसर्ग पर्यटन केंद्राचे काम सुरू आहे. कामाच्या पाहणीसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियमीत भेटी सुरू आहेत.
आठ हेक्टर क्षेत्रावर संरक्षक कुंपन बांधणीसाठी लोखंडी अँगलचे पोल रोवण्यात आले. त्यासाठी खोदलेले खड्डे निकषापेक्षा लहान असून इतर कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अहमदनगरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगण घाट माथ्यावर आठ हेक्टर क्षेत्रात रामेश्वर निसर्ग पर्यटन साकारण्यात येत आहे.
वन विभागाने पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी चिल्ड्रन पार्क, पॅगोडा, औषधी वनस्पती वृक्ष लागवड, टेहळणी मनोरे, अटल घनवन आदी सुविधा असणार आहेत. केंद्रातील पॅगोडासह इतर बांधकामे सुरू आहेत. कामासाठी वापरले जाणारे सिमेंट, डस्ट, खडीचे प्रमाण तपासणीकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. संरक्षक पोल रोवण्यासाठी किमान ०.४५ मी. खोली, ०.४५ रुंदी तर ०.६७ मी. लांबीचे खड्डे घेणे आवश्यक आहे. कुंपनासाठी रोवण्यात येत असलेल्या पोलचे खड्डे निकष डावलून केल्याचा विषय चर्चेत आला आहे.
याप्रकरणी वनविभागाने कागदी घोडे नाचवून विकासकाला निकषानुसार काम करण्याचे पत्र दिल्याची माहिती समजली. या कामाची पाहणी उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक जयराम गोंदके, वनक्षेत्रपाल सुरेश राठोड यांनी केली. परंतु, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वनक्षेत्रपाल राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, फोन न घेतल्याने त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.
निसर्ग पर्यटनाचे काम करण्यासाठी इस्टिमेटप्रमाणे होणे अपेक्षित आहे, परंतु आतापर्यंत झालेले काही काम संशयाच्या भोवऱ्यात आल्याने, वनविभागाने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे झालेल्या कामाप्रमाणे सोयीचे इस्टिमेट करण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.