आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर ग्रामपंचायत निवडणूक:195 ग्रा.पं.चे निकाल; पहिल्या टप्प्यात नेवासे तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी 81 टक्के मतदान झालेले आहे. आज मंगळवार सकाळपासून तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली.

नेवासे तालुक्यातील 13 ग्रा.पं. निकाल जाहीर

जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचे निकाल पहिल्या टप्प्यात जाहीर झाले आहेत. येथील बहुतांशी ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच हे आमदार शंकरराव गडाख गटांचे आहेत. तालुक्यातील चर्चेची ग्रामपंचायत असलेल्या कांगुनी ग्रामपंचायतीवर भाजपचे 11 पैकी 8 सदस्य निवडून आले. गडाख गटाचे सरपंच पदासह 4 सदस्य निवडून आले.

203 ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या होत्या जाहीर

सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील- 34 ,अकोले तालुक्यातील 11, जामखेड- 3, कर्जत- 8, कोपरगाव- 26, नगर- 26, नेवासे-13, पारनेर-16, पाथर्डी-11, राहाता-12, शेवगाव-12, श्रीरामपूर- 6, राहुरी -11 व श्रीगोंदे- 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या

  • या ग्रामपंचायतीपैकी 8 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 195 ग्रामपंचायतीसाठी रविवारी 81 टक्के मतदान झाले होते.
  • मंगळवारी (20 डिसेंबर) सकाळी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. 15 सरपंचांच्या निवडी देखील बिनविरोध झालेल्या होत्या.
  • मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात नेवासे तालुक्यातील 13 ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले आहेत. 13 ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायतींचे सरपंचपद खेचण्यात विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाला यश मिळाले आहे.

तहसील कार्यालयाला छावणीचे स्वरूप

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अहमदनगरच्या तहसील कार्यालयाच्या परिसरात गावागावातून लोक निकाल ऐकण्यासाठी आले होते. या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रोफेसर कॉलनी चौक बंद केला होता. निकाल जाहीर होताच कार्यकर्ते व ग्रामस्थ जल्लोष करताना दिसत होते.

बातम्या आणखी आहेत...