आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन या संघटनेच्या 5 खेळाडूंची पुणे येथे जानेवारी महिन्यात होणार्या प्रतिष्ठेच्या मिनी ओलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीद्वारे शिल्पा पगारे, मयुर अडागळे, सुरज कोलते, युवराज लोखंडे, अनिल तोडकर या खेळाडूंची निवड झाली आहे.
महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने जानेवारी मध्ये पुण्यात मिनी ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगरचे पाच खेळाडू पात्र ठरले आहेत. हे सर्व खेळाडू अहमदनगर मधील एकलव्य तायक्वांदो अकॅडमी, छत्रपती तायक्वांदो, आयडियल तायक्वांदो या तायक्वांदो क्लासेसचे खेळाडू असून, अनेक वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून तायक्वांदो मिनी ऑलिंपिकसाठी जाणारे हे पहिलेच विद्यार्थी असून, खेळाडूंच्या या यशाबद्दल इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष अनिल झोडगे, राज्य सचिव संदीप ओंभासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफ्फार पठाण, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, दिपाली बोडके, विशाल गर्जे आदींनी अभिनंदन केले आहे.
तायक्वांदो स्पोर्टसअसोसिएशन अहमदनगरचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष संतोष लांडे, जिल्हा सचिव व ज्येष्ठ मार्गदर्शक घनश्याम सानप, खजिनदार नारायण कराळे, प्रशिक्षक गणेश वंजारी, धर्मनाथ घोरपडे, योगेश बिचीतकर, दिनेश गवळी, अल्ताफ खान, प्रवीण गीते, अक्षय चौधरी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.