आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंठ्यावर शोककळा:दुभाजक आेलांडून कार ट्रॅव्हल्सवर धडकली; जालना जिल्ह्यातील माजी सरपंचासह पाच ठार

नेवासे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकारण, समाजकारणात स्थिरावणारे पाच चेहरे हरवले; मंठ्यावर शोककळा
  • देवगडजवळील अपघातात मंठा तालुक्यातील पाच तरुणांचा मृत्यू

औरंगाबाद-नगर महामार्गावर रविवारी मध्यरात्री चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आदळली. या भीषण अपघातात जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील भाजयुमोचे पदाधिकारी व एका माजी सरपंचासह ५ साईभक्तांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हे सर्व साईबाबांच्या दर्शनाला गेले होते.

औरंगाबादकडून नगरमार्गे पुण्याकडे जात असलेली गुडलक ट्रॅव्हल कंपनीची बस (एमएच १९ वाय ७१२३) व नगरकडून औरंगाबादमार्गे जालन्याकडे निघालेल्या भरधाव कार (एमएच २१ बीएफ ७१७८) देवगडफाट्याजवळ अाल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने ती दुभाजक अोलांडून ट्रॅव्हल्सवर धडकली. यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवासी व स्थानिकांच्या मदतीने कारमधील जखमींना नेवासे फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात हलवले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला .

एक जण बाजार समितीचा संचालक तर दुसरा गावचा माजी सरपंच, तिसऱ्याची भावजय नुकतीच सरपंच झालेली, तर चौथा खासगी नोकरी करून कुटुंबाची गुजराण करणारा. राजकारण आणि समाजकारणात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी या पाचही युवकांची धडपड सुरू होती. मात्र सोमवारी पहाटे नेवासा तालुक्यातील देवगडजवळ त्यांच्या कारला अपघात झाला अन् पाचही युवकांचा मृत्यू झाला. मंठा तालुक्यातील जयपूर, मेसखेडा, तळतोंडी या गावातील हे युवक असून या घटनेने संपूर्ण मंठा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गावर रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स आणि कार अपघातात मंठा तालुक्यातील पाच तरुणांचा मृत्यू झाला. मन सुन्न करून टाकणाऱ्या या घटनेमुळे मंठा तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिर्डी येथून परतत असताना नेवासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत देवगडजवळ ही घटना घडली. या अपघातात शंतनू नायबराव काकडे (३५,जयपूर ), कैलास विठ्ठल नेवरे (३०, मेसखेडा ), रमेश दशरथ घुगे (३१, मेसखेडा), विष्णू उद्धव चव्हाण (२७, मेसखेडा ), नारायण दिगंबर वरकड (२४, तळतोंडी) यांचा अपघाती मृत्यू झाला. पाचपैकी कैलास, रमेश, विष्णू हे तिघे मेसखेडा येथील रहिवासी होते. यामुळे मेसखेडा गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. सर्व तरुण सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि कमावते असल्यामुळे यांच्या परिवारावर मोठे अरिष्ट आले आहे. कैलास माजी सरपंच होते, तर घुगे यांच्या भावजय सध्या गावच्या सरपंच आहेत. विष्णू हे खासगी नोकरी करून आपले घर चालवत होते. पाच तरुणांपैकी केवळ नारायण वरकड हा तरुण अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. एकूणच सर्व मृत तरुण तिशीतील असल्यामुळे आई-वडील, पत्नी व लहान मुले पोरकी झाली आहेत.

नेमके कुठे गेले होते यासंदर्भात संभ्रम : हे पाचही युवक नेमके कोणत्या गावाला गेले होते याबाबत संभ्रम आहे. हे युवक रविवारी गावातून निघाले. ते औरंगाबाद येथे एका कामासाठी गेले होते, असे एकाच्या घरातून सांगण्यात आले. काहींनी ते शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते, असे सांगितले. कामानिमित्त पुण्याला गेले होते व येताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे एका युवकाच्या नातेवाइकांनी सांगितले. ते नेमके कुठून येत होते यासंदर्भात दिवसभर संभ्रम होता.

वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
शंतनू काकडे हे मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा भाजयुमोचे तालुका सरचिटणीस होते. आई-वडिलांना एकुलते एक असणारे शंतनू यांच्या वडिलांचे मागील दीड वर्षापूर्वीच निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली होती. परंतु कालच्या घटनेने घरातील एकमेव कर्ता पुरुष गमावला. शंतनू यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुलांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्या आणखी आहेत...