आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अहमदनगर जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू, मालवाहतूक ट्रकची कारला जोरदार धडक

अहमदनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यालयीन रोस्टर तपासणीसाठी नाशिकला गेलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा खाजगी वाहनाचा राहुरी तालुक्यातील वांबोरी फाट्याजवळ शनिवारी रात्री अपघात झाला. या घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

अशोक परसराम व्यवहारे (वय ५६) व विनायक कातोरे (वय ४३) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. संतोष लंके जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व्यवहारे हे पशुसंवर्धन विभागात कक्ष अधिकारी तर कातोरे हे महिला व बालकल्याण विभागात वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत होते.

कसा झाला अपघात?

शनिवारी सकाळीच हे सर्व कर्मचारी आपापल्या विभागातील कर्मचारी रोस्टर तपासणीसाठी खाजगी चार चाकी वाहनातून नाशिक विभागीय कार्यालयात गेले होते. विभागीय कार्यालयातील काम आटोपल्यानंतर माघारी येताना नगर मनमाड रोडवर वांबोरी फाट्याजवळ कर्मचारी प्रवास करत असलेल्या कारला एका मालवाहतूक ट्रकने समोरून जोरदार धडक दिली.

या घटनेनंतर कर्मचाऱ्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून वेळेत एअर बॅग उघडल्याने चालक लंके जखमी झाले, अशी माहिती समजली. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.