आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील दैनंदिन कचरा संकलनाचा उडालेला बोजवारा, एलईडी पथदिव्यांचा प्रकल्प अशा विविध कामांच्या ठेकेदारांकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याने नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, उपायुक्त यशवंत डांगे यांनी ठेकेदारांच्या अडचणी मांडत त्यांचेच समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याने नगरसेवक चांगलेच संतापले.
ठेकेदारांच्या अडचणीऐवजी नागरिकांच्या समस्यांचा विचार करा, मनपा ठेकेदारांच्या दावणीला बांधली आहे का? असा सवाल करत डांगे यांना धारेवर धरले. अखेर महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मध्यस्थी करत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित महासभेत एलईडी पथदिवे प्रकल्पावरून मालन ढोणे व दिपाली बारस्कर यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. उपायुक्त डांगे यांनी या प्रकल्पामुळे मनपाच्या पथदिवेच्या वीजबिलात ७० टक्के बचत झाली, त्यावर प्रकाश भागानगरे यांनी पथदिव्यांचे वीजबिल कमी व्हावे यासाठी अनेक प्रभागातील पथदिवे बंद ठेवले जातात, असा थेट आरोप केला. त्याला वाकळे व स्वप्नील शिंदे यांनी दुजोरा दिला.
प्रकल्पाच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे प्रलंबित आहे, त्यावर निर्णय का घेतला जात नाही, अशी विचारणा नगरसेवकांनी केली, मात्र त्याला उत्तर मिळाले नाही. शहरात दैनंदिन कचरा संकलन होत नाही, चार-चार दिवस घंटागाडी नागरिकांच्या घरी जात नाही, तरीही रोज शहरात १३० टन कचरा संकलन व त्यावर प्रक्रिया केल्याचे कसे दाखवले जाते, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला.
कुमारसिंह वाकळे यांनी तर कचऱ्यावर पाणी मारून त्याचे वजन वाढवले जाते असा आरोप केला. कॉपी करून मनपाने शहर सौंदर्यकरणात तिसरा क्रमांक पटकावल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ५० लाखांचे पोकलेन ठरले बिनकामाचे! महापालिकेने स्वतःचे दोन जेसीबी व ५० लाखांचे दोन पोकलेन खरेदी केले. परंतु ते ओढे-नाले सफाईच्या कामात कुचकामी ठरत आहेत. त्याची क्षमताच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे असे बिनकामाची वाहने खरेदी का केली, असा सवाल नगरसेवकांनी केला. नगरसेवक श्याम नळकांडे यांनी चालक उपलब्ध होत नसल्याने गेली आठ महिने कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेली वाहने उभे आहेत, याकडे लक्ष वेधले.
५० लाखांचे पोकलेन ठरले बिनकामाचे!
महापालिकेने स्वतःचे दोन जेसीबी व ५० लाखांचे दोन पोकलेन खरेदी केले. परंतु ते ओढे-नाले सफाईच्या कामात कुचकामी ठरत आहेत. त्याची क्षमताच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे असे बिनकामाची वाहने खरेदी का केली, असा सवाल नगरसेवकांनी केला. नगरसेवक श्याम नळकांडे यांनी चालक उपलब्ध होत नसल्याने गेली आठ महिने कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेली वाहने उभे आहेत, याकडे लक्ष वेधले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.