आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्त्याव्याचा अहमदनगर शहर भाजपच्या वतीने मंगळवारी (2 डिसेंबर)ला निषेध करण्यात आला.
अजित पवारांविरोधात घोषणाबाजी
अहमदनगर शहरातील दिल्ली गेट येथे शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ फलक झळकावून जोरदार घोषणा देण्यात आल्या. धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो..., अजित पवारांविरोधात जोरदार घोषणा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
अजित पवारांचे वक्तव्य अविवेकी
यावेळी भैया गंधे म्हणाले,छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. ज्यांनी धर्मांसाठी आयुष्य वेचत बलिदान दिले. अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांसारख्या जबाबदार पदाधिकाऱ्याने अविवेकीपणे वक्त्याव्य करणे अशोभनीय आहे. अजित पवारांनी छत्रपतींच्या इतिहासाचा अभ्यास करावा. असे त्यांनी सांगितले.
अजित पवार रान पेटवतात..!
गंधे म्हणाले,भाजपाच्या नेत्यांकडून राष्ट्र पुरुषांबद्दल एखाद्या वेळेस चुकून एखादे वाक्य निघाले तर रान पेटवणारे अजित पवार हेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलत आहेत. याचा भारतीय जनता पार्टी जाहीरपणे निषेध करत आहे. अजित पवारांनी सर्व जनतेची त्वरित माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही, असा इशारा शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिला.
यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, सरचिटणीस महेश नामदे, महिला मोर्चा अध्यक्षा अंजली वल्लाकटी, बाळासाहेब भुजबळ, मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व अजय चितळे, कालिंदी केसकर, राजू मंगलारप, प्रशांत मुथा, महावीर कांकरिया, शरद बारस्कर, बाबासाहेब सानप, सागर शिंदे, मल्हार गंधे, स्वाती पवळे, जालिंदर शिंदे, मिलिंद भालसिंग, श्रीगोपाल जोशी, गोपाल वर्मा, राहुल रासकर, शशांक कुलकर्णी, नरेश चव्हाण, ज्ञानेश्वर धिरडे, राहुल बुधवंत आदी पदाधिकारी उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.