आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:‘माय एफएम’च्या महाराष्ट्र अवॉर्ड-पावर मेन अँड वुमेन 2022 मध्ये अहमदनगरच्या व्यावसायिकांचा सन्मान; माय एफएम व दैनिक भास्कर ग्रूप नेहमीच विविध उपक्रमाचे आयोजन करात असते

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली दोन वर्षे संपूर्ण जगासाठी एका भयावह स्वप्नासारखी गेली. यात अनेकांचे व्यवसाय बुडाले, अनेक जण कर्जबाजारी झाले, नोकरी, संपत्ती सर्व गेले. पण यात अशीही काही लोक होते ज्यांनी हार न मानता पुन्हा जोमाने मेहनत केली आणि आपले स्थान कायम केले. माय एफएम व दैनिक भास्कर ग्रूप नेहमीच विविध उपक्रमाचे आयोजन करात असते.

माय एफएम प्रस्तुत “महाराष्ट्र अवॉर्ड - पावर मेन अँड वूमेन २०२२” यामधे संपूर्ण महाराष्ट्रातून अशाच विविध व्यवसायातील उद्योजक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रात देदिप्यमान यश संपादन करणाऱ्या व्यावसायिक, उद्योजकांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यात आपल्या नगरमधील डॉ. भूषण कदम, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील आणि डॉ. रेखा पाटील, के. बालराजू, अमित पुरोहित, अभिनाथ शिंदे व कृष्णा मसुरे, सतीश बोथरा आणि रौनक बोथरा यांना सन्मानित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाशिक शहरामध्ये हॉटेल रेडिसन ब्लू अँड स्पा येथे हा सन्मान सोहळा पार झाला.

महाराष्ट्र अवॉर्ड २३ एप्रिलला घेण्यात आला. यासाठी माय एफएमच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. यावेळी बिझनेस हेड सौरभ वाडेकर, रिजनल बिझिनेस हेड विवेक पॉल व अहमदनगरच्या ग्रूप हेड प्रियांका चिखले व इतर प्रमुख मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...