आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर भाजप आक्रमक:पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हिन निंदनीय टीका केली. या टीकेच्या निषेधार्थ शनिवारी अहमदनगर शहर भाजपच्यावतीने लक्ष्मीकारंजा येथील पक्ष कार्यालय परिसरात बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्यास चपला मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शेवगाव येथेही भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला.

अहमदनगर शहर भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात शहर भाजपाचे महेश नामदे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, नरेंद्र कुलकर्णी, अंजली वल्लाकटी, छाया रजपूत, मल्हार गंधे, ज्योती दांडगे, कालिंदी केसकर, रेखा विधाते, संध्या पावसे, पल्लवी जाधव, अनिल गट्टाणी, संतोष गांधी, मिलिंद भालसिंग, सुमित इपलपल्ली, कुंडलिक गदादे, राहुल बुधवंत, राजेंद्र घोरपडे, सुमित बटुळे, सुनील सकट, श्रीगोपाल जोशी, चंद्रकांत पाटोळे, अमोल निस्ताने, सचिन पावले, श्रीकांत फंड, अभिषेक दायमा, महेश तवले, आदेश गायकवाड, जालिंदर शिंदे, ज्ञानेश्वर धिरडे, लक्ष्मीकांत तिवारी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला घेरण्यात अपयशी ठरलेल्या बिलावल भुट्टो यांच्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करावा तितका कमी आहे. हा पूर्ण भारताचा अपमान आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही अशोभनीय टिप्पणी केली आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. असे शहर जिल्हाध्यक्ष भैया गांधी यांनी म्हटले आहे.

अहमदनगर दक्षिण भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे तसेच शेवगाव तालुका भाजपा पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेवगाव येथील क्रांती चौकात भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, सरचिटणीस भीमराज सागडे, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ माळवदे आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...