आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरण यातना:एकाच शववाहिनीत एकावर एक टाकले 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह, अहमदनगरमधील संतापजनक घटना

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे शहरात मृतांची संख्या वाढत असताना प्रशासनातील माणुसकीही गोठल्याचा प्रत्यय रविवारी अाला. जिल्हा रुग्णालयातून रविवारी रात्री थोडेथोडके नव्हे तर १२ कोरोना रुग्णांचे मृतदेह अक्षरश: एकाच शववाहिनीत एकावर एक टाकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ८ पुरुष आणि ४ महिलांचे हे मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत होते.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १० हजारांवर पोहोचली असून त्यापैकी सुमारे ६ हजार ६४७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अमरधामातील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. मृत्यूचा आकडा वाढता असल्याने अंत्यविधीसाठी चार ते सहा तास वाट पाहावी लागते, याकडे दैनिक ‘दिव्य मराठी’ने दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता कोरोनाबाधित मृतदेहांच्या हेळसांडीचा प्रकार समोर आला आहे.

प्रशासनाला माणसाची किंमत नाही : सरोटे
माळीवाडा भागातील एका मित्राच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. त्या ठिकाणी मृतदेह वाहणाऱ्या मनपाच्या वाहनात १२ मृतदेह एकमेकांवर रचल्याचे दिसले. यावरून प्रशासनाला माणसांची किंमत राहिली नसल्याचे दिसून येते, असे नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले.

शूटिंंग करू नका : व्हिडिओ क्लिपमध्ये आवाज : शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या शववाहिनीचे फोटो व क्लिप रविवारी (९ आॅगस्ट) रात्री मोबाइलवर चित्रित केली. चित्रीकरण करतानाही बोराटे यांना शूटिंग करू नका, असे एक जण सांगत असल्याचे स्पष्ट ऐकू येते.

दोरीने बांधतात शववाहिनीचे दरवाजे
शववाहिनी जुनाट व खिळखिळी झाली असून गाडीचे दरवाजे दोरीने बांधले जातात. या वाहनाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वतंत्र अद्ययावत वाहन खरेदीची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...