आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीरामपुर तालुक्यातील उंदिरगाव येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभाग, महसूल, नगरपालिका व पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
मास्क, सॅनिटायझर,सामाजिक अंतर याबाबत नागरिक उदासीन झाले आहे. त्याचा परिणाम दिसू लागला आहे. मास्क न लावणाऱ्यांवर दररोज श्रीरामपुरात पोलिसांची दंडात्मक कारवाई होत असली, तरी त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. उंदिरगाव येथे एकाच कुटुंबातील दहा जण बाधित झाल्याने आणि इतर ठिकाणीही रुग्ण वाढून तालुक्याचा आकडा २२ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह महसूल, नगरपालिका व पोलिस विभाग सतर्क झाला आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी प्रांताधिकारी अनिल पवार, उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील,पोलिस निरीक्षक संजय सानप, मुख्यधिकारी गणेश शिंदे यांच्या पथकाने बसस्थानक,भाजी मंडई, बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर फिरून नियमांचे उल्लंघन करणारे व मास्क न वापरणाऱ्या सुमारे २०० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
खासगी प्रयोगशाळेची संख्या उपलब्ध होत नाही
शासकीय आकडेवारीनुसार श्रीरामपूर तालुक्यात २२ कोरोना बाधित आहे. शहरातील डॉ. मोरगे रुग्णालयात १२ तर नगर येथील शासकीय रुग्णालयात १० जण उपचार घेत आहेत.मात्र अनेकजण खाजगी प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांची माहिती आरोग्य विभागाला उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.
१३१३ जणांना दिली लस
श्रीरामपूर तालुक्यातील आरोग्य विभागातील ८५२ व पंचायत समिती, महसूल व पोलीस तसेच नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मिळून ४६१ जणांना कोरोनाची लस दिली आहे. दुसरा डोस १७ फेब्रुवारी पासून सुरू झाला आहे. लस घेतल्यानंतर अद्यापपर्यंत कोणालाही गंभीर त्रास झाला नाही.'' डॉ. योगेश बंड, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.