आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर:क्वाॅरंटाइन पती-पत्नी दोन मुलांसह गेले पळून, क्वॉरंटाइन केलेल्या एकाची दुचाकीही दामटली

राहुरी शहरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार, जोडप्याविरोधात गुन्हा दाखल

क्वाॅरंटाइन केलेल्या पती-पत्नी आपल्या दोन लहान मुलासह पळून गेले आहेत. या जोडप्याने शाळेत क्वाॅरंटाइन केलेल्या एकाची मोटरसायकलही पळवून नेल्याने प्रशासनात खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक रविवारी पहाटेच्या वेळात ही घटना घडली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेरून गावात दाखल होणाऱ्यांची तपासणी करून क्वाॅरंटाइन करण्याचे आदेश अाहेत. ३ दिवसांपूर्वी या कुटुंबाला क्वाॅरंटाइन करून एका शाळेत ठेवण्यात आले होते. या शाळेत आणखी १० जणांना क्वाॅरंटाइन केले होते. शनिवारी रात्री या जोडप्याने बाहेर पडण्यासाठी गोंधळ घातल्याने सरपंच व पोलिस पाटलाने संपूर्ण रात्र शाळेजवळ जागून काढली. मात्र, रविवारी पहाटे अंधाराचा फायदा घेऊन या जोडप्याने शाळेच्या गेटला लावलेले टाळे तारेच्या सहाय्याने काढून धूम ठोकली. त्यांचा रविवारी दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र तो व्यर्थ ठरला. अखेर प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...