आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:जिल्ह्यातील 17. 49  लाख नागरिकांचे आधार कार्ड होणार अपडेट, जिल्हाधिकारी साळीमठ यांची माहिती

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात आधार कार्डमध्ये कुठलीही दुरुस्ती न केलेल्या नागरिकांचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय घेतला असून अहमदनगर जिल्ह्यातील 17 लाख 49 हजार 888 नागरिकांचे आधार कार्ड अपडेट होणार आहेत. नागरिकांनी आधार कार्ड अद्यावतीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांनी सोमवार ( 6 मार्च)ला केले आहे.

या नागरीकांनी करावे अपडेशन

ज्या आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधारमध्ये दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही अशा आधार कार्डधारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील 17 लाख 49 हजार 888 आधार धारकांची आधार माहिती अद्यावत करणे बाकी आहे. या नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन सालीमठ यांनी केले आहे.

17 लाख 49 हजार 888 जणांचे अपडेशन बाकी

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) यांच्या सद्यस्थितीतील अहवालानुसार अहमदनगर जिल्हयातील 17 लाख 49 हजार 888 इतक्या आधारधारकांची आधार माहिती अद्यावत करणे बाकी आहे.

आधार केंद्रावर करा अद्यावत

नागरिकांना आधार माहितीचे अद्यावतीकरण करण्यासाठी आपल्या नजीकच्या आधार केंद्रांमध्ये समक्ष जाऊन अद्यावतीकरण करता येईल. किंवा ऑनलाईन अद्यावतीकरण देखील करता येईल. १५ मार्च ते १४ जून या तीन महिन्यासाठी हे अद्यावतीकरण संकेतस्थळावर मोफत राहील असेही जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...