आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता वाढली:पावसाची दडी; अहमदनगर जिल्ह्यात जून महिन्याच्या दहा दिवसांत ३० टक्के पावसाची तूट

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसाची दडी; अहमदनगर जिल्ह्यात जून महिन्याच्या दहा दिवसांत ३० टक्के पावसाची तूट

अहमदनगर जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत 30 टक्के पावसाची तूट असून, गेल्या वर्षी जिल्ह्यात 10 जून पर्यंत 46 टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र केवळ 16 टक्के पावसाची नोंद 10 जून अखेर पर्यंत झाली आहे. जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे, जामखेड, संगमनेर, अकोले वगळता इतरत्र मात्र पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे.

शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर शहरात मात्र काहीसे ढगाळ वातावरण होते.दोन दिवसात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून आता पंचनामे होणार आहेत.

दरवर्षी नगर शहर व जिल्ह्यात 1 जून पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र एक जून तारीख कोरडी गेली आहे. तत्पूर्वी पंधरा दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. नगर जिल्ह्यात गेल्या रविवारी काही भागात पाऊस झाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री संगमनेर, पारनेर तालुक्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत पावसाची मोठी तूट आहे.

गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 46 टक्के पाऊस 10 जून पर्यंत झाला होता यंदा मात्र 10 जून पर्यंत केवळ 16 टक्के पावसाची नोंद झाली आहे. प्रथमच 30 टक्के पावसाचे तूट जिल्ह्यात आहे. आतापर्यंत पारनेर, श्रीगोंदे, अकोले , संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्या दोन वर्षात प्रथमच काही तालुके वगळता इतरत्र तालुक्यात पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान पारनेर व संगमनेर तालुक्यात झालेल्या वादळाच्या पावसामुळे नुकसान झालेल्या परिसराचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय दहा दिवसांत झालेला पाऊस

पारनेर 49, श्रीगोंदे 28, कर्जत 9.1, जामखेड 16.9, शेवगाव 2, पाथर्डी 4, नेवासे 9.8, राहुरी 2.0, संगमनेर 26.7, अकोले 27.8, कोपरगाव 6.3, श्रीरामपूर 4.6, राहाता 4.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...