आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील नागरी सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या बँको या संस्थेतर्फे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेस सर्वाधिक ठेवी बद्दलचा देश पातळीवरचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नोकरदार वर्गाच्या गटातील पुरस्कार
एक हजार ते दोन हजार कोटींच्या ठेवी असलेली नोकरदार वर्गाची बँक या गटात शिक्षक बँकेस हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लोणावळा येथे झालेल्या बँकोच्या वार्षिक तीन दिवसीय सेमिनारमध्ये हा पुरस्कार रिझर्व बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर ए. एस. काळे व बँकोचे प्रमुख अविनाश शिंत्रे व अशोक नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, शरदभाऊ सुद्रिक, राजू राहाणे, माजी व्हाईस चेअरमन विद्युल्लता आढाव, उषा बनकर, संचालक अनिल भवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशभरातील नागरी सहकारी बँकांचे 400 पेक्षा जास्त प्रतिनिधी या सेमिनारला उपस्थित होते. एक हजार ते दोन हजार कोटींच्या ठेवी असलेली नोकरदार वर्गाची बँक या गटात शिक्षक बँकेस हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
बॅंक राबवते अनेक योजना
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या कुटुंब आधार निधी योजना, शुभमंगल योजना, मयत कर्ज निवारण निधी, दोंदे पारितोषिक योजना, वैद्यकीय मदत योजना, कर्ज वितरणाची सुलभ पद्धती आदींबाबतची माहिती बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, शरद सुद्रिक व राजू राहणे यांनी सेमिनार मध्ये उपस्थित देशभरातील प्रतिनिधींसमोर सादर केली. या सर्व अभिनव योजनांचे उपस्थितांनी कौतुक केले. ही योजना आमच्या बँकेतही सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती उपस्थित कर्मचारी बँकांच्या प्रतिनिधींनी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकेत ठेवी आहेत म्हणजे बँकेने सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे याबद्दल सर्वांनी अहमदनगर शिक्षक बँकेचे अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.