आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:अहमदनगर जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 94.41 टक्के; यंदाही मुलींचीच आघाडी, पुणे विभागात नगर दुसऱ्या क्रमांकावर

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९४.४१ टक्के लागला असून पुणे विभागात नगर जिल्ह्याने सोलापूरनंतर दुसरे स्थान पटकावले आहे. यंदाही निकालामध्ये मुलींनीच आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील ९६.७३ टक्के मुली तर ९२.७२ टक्के मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर ऑनलाईन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या ऑफलाईन परीक्षा दिल्या. बुधवारी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला. जिल्ह्यातील १७९ केंद्र, उपकेंद्र ९५० उपकेंद्र व १ हजार १६ शाळांत या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत झाल्या. परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ६६७ पैकी ६३ हजार ४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३३ हजार ७५१ मुले पास तर २५ हजार ७२९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

आता क्रमांक काढण्याची पद्धतच बंद झाल्यामुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्वाधिक गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. बारावीच्या निकालात शेवगाव तालुक्याने आघाडी घेतली आहे. या तालुक्याचा निकाल सर्वाधिक (९८.५७ टक्के) लागला आहे. तर श्रीरामपूर तालुक्याचा निकाल सर्वात कमी (८६.७६ टक्के) लागला. नगर शहर व तालुक्याचा निकाल ९६.९२ टक्के लागला. पुणे विभागात अहमदनगरने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरची टक्केवारी ९४.८३ टक्के आहे. तर पुण्याचा निकाल ९२.७० टक्के लागला.

गुणवंतांना आवाहन
बारावीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे फोटोसह प्रकाशित केली जाणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रकिसेह फोटो सिव्हिल हडको येथील दिव्य मराठी कार्यालयात जमा करावेत. गुणवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे उद्या गुणांसह प्रकाशित केली जातील.

विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही कौतूक
कोरोना कालावधी असल्याने बारावीचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आला. शेवटच्या टप्प्यात काही अतिरिक्त ऑफलाईन वर्ग भरवून शिक्षकांनीही मेहनत घेतली. तसेच विद्यार्थ्यांनीही चांगला अभ्यास केल्याने जिल्ह्याचा निकाल ९४.४० टक्के लागला.'' अशोक कडूस, शिक्षणाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...