आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यामधील दरवर्षी फळे व भाजीपाला निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सन 2021-22 मध्ये सुमारे 2254 शेतकऱ्यांनी द्राक्षे, आंबा, डाळिंब व भाजीपाला निर्यातीसाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अपेडा अंतर्गत नोंदणी केली आहे. सुमारे 1616. 45 हेक्टर क्षेत्र यासाठी नोंदवण्यात आले आहे.
2020- 21 मध्ये फळे, भाजीपाला निर्यातीसाठी 713 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये आता तिप्पट वाढ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध फळबागांचे एकूण 76 हजार 172 हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये डाळिंब पिकाखालील क्षेत्र 3 लाख 76 हजार 77 हेक्टर आहे. द्राक्षाचे 2783 हेक्टर, लिंबू 1 लाख 24 हजार 62 हेक्टर, आंबा पिकाखालील 6 हजार 758 हेक्टर क्षेत्र आहे. विविध फळांच्या व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून अपेडा अंतर्गत नोंदणी करावी लागते. सन 2021- 22 मध्ये ग्रेपनेट अंतर्गत द्राक्ष निर्यातीसाठी 871 शेतकऱ्यांनी 587.87 हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली. मॅंगोनेट अंतर्गत 106 शेतकऱ्यांनी 102.5 हेक्टर क्षेत्रावरील आंब्याच्या निर्यातीसाठी नोंद केली. अनारनेट अंतर्गत 1269 शेतकऱ्यांनी 919.84 हेक्टर क्षेत्राची डाळिंब निर्यातीसाठी नोंद केली. व्हेजनेट अंतर्गत भाजीपाला निर्यातीसाठी 7 शेतकऱ्यांनी 5.42 हेक्टर क्षेत्राची नोंद केली. केळी पिकासाठी एका शेतकऱ्यांनी नोंद केली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध फळांच्या निर्यातीसाठी पाथर्डी तालुक्यातील के. बी. एक्सपोर्ट ही एकमेव पॅक हाऊस कंपनी आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा आणखी पॅक हाऊस कंपनीची गरज आहे.
फळांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीत वाढ
सन 2018-19 मध्ये द्राक्ष, आंबा, डाळिंब फळांच्या निर्यातीसाठी 637 शेतकऱ्यांनी 507.77 हेक्टर क्षेत्राची नोंद केली होती. 2019- 20 मध्ये यात झाल्याचे दिसून आले. या वर्षात 500 शेतकऱ्यांनी 353.37 हेक्टर क्षेत्राची नोंद केली. 2021-22 मध्ये यात वाढ झाली असून फळे भाजीपाला निर्यातीसाठी 713 शेतकऱ्यांनी 499.79 हेक्टर क्षेत्राची नोंद केली होती. सन 2021-22 मध्ये 2254 शेतकऱ्यांनी फळे व भाजीपाला निर्यातीसाठी 1616.45 हेक्टर क्षेत्राची नोंद केली. असे अहमदनगर कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी म्हटले आहे.
आंब्याची निर्यातही वाढली
अहमदनगर जिल्ह्यातून चालू हंगामात सुमारे 350 टन आंब्याची विविध देशांत निर्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 106 शेतकऱ्यांनी अपेडा अंतर्गत 2021- 22 या वर्षात मॅंगोनेटद्वारे 102 हेक्टरवरील आंबा निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली होती. या अंतर्गत आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.