आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव:आगीची दुर्घटना हलगर्जीपणामुळे, मनुष्यवधाचा गुन्हा ‌दाखल करा; राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा रुग्णालायात लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधक ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा ‌दाखल करा, अशी मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील मंत्र्यांवर देखील निशाणा साधला.

राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, निष्पाप लोकांचा बळी गेला. प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा हा परिणाम आहे. आयसीयूत रुपांतर केलेल्या सेंटरचे फायर ऑडीट झाले नसल्याची माहीती आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मात्र यापूर्वी आदेश दिले ते बासणात गेले, अशी टीका विखे पाटलांनी केली. घटनेचे राजकारण करणार नाही मात्र ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा ‌दाखल करावा, अशी मागणी विखे पाटलांनी केली.

अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी साडेदहा वाजता शॉकसर्किटमुळे आग लागली. या विभागात 17 कोविड रूग्ण दाखल होते. यापैकी 11 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...