आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक निर्देशांकात अहमदनगर टॉप टेनमध्ये:राज्यात सातारा जिल्हा नंबर वन, औरंगाबाद दहाव्या क्रमांकावर

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या जिल्हा शैक्षणिक निर्देशांकात उत्कृष्ट कामगिरी करत 22 व्या स्थानावरून अहमदनगर जिल्हा नवव्या स्थानी पोहोचला आहे. राज्यात सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून मागील वर्षी 35 व्या स्थानावर असलेला औरंगाबाद जिल्हाही दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

दरवर्षी राज्यस्तरावर जिल्हा शैक्षणिक निर्देशांक 2017-2018 पासून जारी केला जातो. या निर्देशांकात जिल्ह्यांचे स्थान निश्चित करताना 83 मुद्द्यांवर 600 पैकी गुण दिले जातात. हे गुण यु-डायस प्रणालीच्या माहितीनुसार तसेच जिल्हास्तरावर राबवलेल्या विविध शासकीय योजनात विद्यार्थ्यांचा वाढलेला सहभाग या आधारावर दिले जातात. तसेच तिसरी, पाचवीच्या विद्यार्थ्यांचाही सर्वे केला जातो. ही माहिती ऑनलाईन भरल्यानंतर सॉफ्टवेअरद्वारे क्रमांक निश्चित केले जातात. 2019-2020 मध्ये अहमदनगर जिल्हा बाविसाव्या स्थानावर होता, त्यात आता सुधारणा होऊन नवे स्थान जिल्ह्याने पटकावले. त्यात नगरला 600 पैकी 424.25 गुण मिळाले आहेत.

राज्यात पहिल्या दहा क्रमांकामध्ये सातारा प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय, रत्नागिरी तृतीय, बीड चार, मुंबई पाच, उस्मानाबाद सहा, पुणे सात, लातूर आठ, नगर नऊ, तर औरंगाबाद जिल्हा दहाव्या स्थानावर आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.

पुढील वर्षी पहिले स्थान

जिल्ह्यातील सर्व शिक्षक विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यासह संपूर्ण यंत्रणांच्या प्रयत्नामुळे अहमदनगर जिल्ह्याने शैक्षणिक निर्देशांकात चांगली कामगिरी केली. ही कामगिरी अधिक चांगली करून पुढील वर्षीचा ज्यावेळी निर्देशांक जारी होईल त्यावेळी अहमदनगर पहिल्या स्थानावर असेल असा आमचा प्रयत्न राहील. - भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...