आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षकांची माहिती:अहमदनगर एलसीबीची श्रीरामपुरात कारवाई; 8 गावठी कट्ट्यांसह तिघांना अटक, तर 10 काडतुसे जप्त

अहमदनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदशीररित्या 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन आरोपींची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय २५), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय २२) अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (सर्व रा. श्रीरामपुर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड नं. ३, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर व अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कारवाईचे आदेश दिले होते. श्रीरामपपूर येथे तीन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी हॉटेल राधिकाजवळ येणार असल्याची माहिती कटके यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार पथकातील सोमनाथ दिवटे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खसे, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, मयुर गायकवाड, सागर ससाणे व चंद्रकांत कुसळकर यांनी सापळा लावून संशयीत इसमांना घेराव घातला.

पथकाची चाहूल लागताच ते पळून जात असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. राजेंद्र देवमन वाघ यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...