आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर प्रारूप रचना:जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट- गण अधिसूचनेवर आतापर्यंत 65 हरकती, उद्या सुनावणी

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गण रचनेच्या प्रारूप अधिसूचनेवर बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयाकडे हरकती नोंदवण्यात येत होत्या. बुधवारी शेवटच्या दिवसा अखेरपर्यंत 65 हरकती नोंदवण्यात आल्या असून, सर्वाधिक हरकती अहमदनगर तालुक्यातून नोंदवण्यात आलेल्या आहेत.गुरुवारी या हरकतींवर नाशिक येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून,जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गट-गण रचनेची प्रारूप अधिसूचना ( 2 जून) ला प्रसिध्द झाली होती. 8 जून पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. बुधवार हरकती नोंदवण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. बुधवारी शेवटच्या दिवशी 12 हरकती नोंदविण्यात आल्या असून, आतापर्यंत 65 हरकती गण व गटातील नोंदवण्यात आलेल्या आहेत. नोंदविलेल्या हरकतींवर गुरुवारी विभागीय आयुक्तालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

अशा आहेत हरकती

जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या प्रारुप अधिसूचनेवर 13 हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. यात अकोले तालुक्यातील 5, राहुरी तालुक्यातील 3, संगमनेर 8, कोपरगाव तालुक्यातील 3, पाथर्डी तालुक्यातील 1, श्रीरामपूर तालुक्यातील 2 , नगर तालुक्यातील 11, कर्जत तालुक्यातील 7, जामखेड तालुक्यातील 4, पारनेर तालुक्यातील 5, नेवासे तालुक्यातील 2, श्रीगोंदे तालुक्यातील 3, राहाता तालुक्यातील 3,अशा हरकती प्राप्त झालेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...