आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये:राज्यांना इंजेक्शन मिळत नाही, पण भाजप खासदाराने आपल्या मतदारांसाठी विशेष विमानाने दिल्लीवरुन आणले रेमडिसिविर

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला जमेल तशी मदत मी अहमदनगर जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. दरम्यान रेमडिसिविरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. राज्य सरकारकडेही रेमडिसिविरचा पुरवठा उपलब्ध नाही. मात्र असे असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघासाठी थेट दिल्लीवरुन रेमडिसिविर इंजेक्शनचा मोठा साठा आणला आहे.

आपल्या मतदारसंघासाठी भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंजेक्शनचा साठा दिल्लीहून अहमदनगरमध्ये आणला आहे. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. 300 इंजेक्शन्स त्यांनी आपल्या मतदारांसाठी आणले आहेत. यानंतर राज्य सरकारला एकीकडे इंजेक्शन मिळत नसताना दुसरीकडे भाजप खासदाराला इंजेक्शन कसे मिळत आहेत असे सवालही केले जात आहेत.

मला कारवाईची काळजी नाही
सुजय विखेंनी याविषयी फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये ते विमानात असल्याचे दिसतेय. ते म्हणाले की, 'मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये जे राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळाले. मला डॉक्टर या नात्याने विनंती करायची आहे की. जोपर्यंत ऑक्सिजन आणि औषधांचा साठ्याचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत असे करु नका. आज दोन दिवसांपूर्वी मी माझ्या हॉस्पिटलला होतो. तिथे बावीस वर्षांच्या तरुणांचाही ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहे. आपल्या आरोप प्रत्यारोपाने त्यांना जीवन मिळणार नाही. मी खासदार या नात्याने माझ्या परीने नगर जिल्ह्यासाठी हे रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन आलो आहे. आज या परिस्थितीमध्ये मी माझ्यावर होणाऱ्या दडपणाची काळजी करु शकत नाही. माझ्यावर होणाऱ्या कारवाईची काळजी करु शकत नाही. कारण माझ्यासमोर तो जीव महत्त्वाचा आहे. हे चांगल काम करत असताना माझ्यावर कारवाई होईल. आता माझ्यावर कुणी आरोप करेल. लोक म्हणतील की हा पक्षाचा खासदार आहे म्हणून याला औषध मिळाले. पण मला कशाचीही काळजी नाही.

राजकारण आणू नका
मला जमेल तशी मदत मी अहमदनगर जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलांचा आज तडफडून मृत्यू होत आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलेय, निवडून दिलेय, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करतोय असे विखे म्हणाले. तसेच हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणे आमची जबाबदारी आहे आणि या गोष्टीचे मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नसल्याचेही सुजय विखे म्हणाले.

कारवाई होईल की नाही माहित नाही
पुढे बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, मी फॅक्ट्रीमध्ये गेलो. तिथे माझ्या मैत्री संबंधांचा आरोप केला. मदत घेतली आणि मला औषधे मिळाली. आता यामुळे माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. कारण मी खासगी विमानाने औषधे आणत आहे. पण माझ्या मनात पाप नाही, यामुळे मी कारवाईला घाबरत नसल्याचेही सुजय विखे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...