आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर कोतवाली पोलिसांतर्फे शहरात रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्याविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. रात्री उशिरा बस स्थानक परिसरात तसेच शहरात इतर ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईच्या धडाका पोलिसांनी सुरू केला आहे.
रात्री अपरात्री विनाकारण फिरत असलेल्या मोटरसायकल चालकांना अडवून कोतवाली पोलिस चौकशी करत आहेत. पुणे बसस्थानक परिसरात उघड्यावर दारू पिणाऱ्या काही जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यात कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरा शहरातून वाहन घेऊन जाणाऱ्या इसमाकडून तलवार जप्त केली होती.
वाहनांची तपासणी
माळीवाडा बसस्थानक, पुणे बसस्थानक व इतर चौकात रात्री विनाकारण मोटरसायकली वरून फिरणाऱ्यांना अडवून कोतवाली पोलिस चौकशी करत आहेत. वाहनांचे नंबर पोलिसांकडून तपासले जात आहेत. या शोध मोहिमेत पोलिसांना काही जबरदस्तीने मोबाईल चोरणारे मारहाण करून लुटणारे गुन्हेगार सुद्धा हाती लागले आहेत.
संशयितरित्या फिरणाऱ्या तीन चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करण्यात आले आहे. कोतवाली ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव हे स्वतः पथकासह रात्री उशिरापर्यंत गस्त घालत आहेत.
कारवाईचा बडगा
६२ आस्थापनांवर कारवाई दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या रात्री ११ नंतर उघड्या दिसल्यास कारवाई करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ६२ आस्थापनांवर कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही रात्री अकरानंतर दुकाने खुली ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.