आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर प्रेस क्लबतर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता’पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे रिपोर्टर बंडू पवार यांना जाहीर झाला. याशिवाय सूर्यकांत वरकड, महेश देशपांडे, मिलिंद देखणे यांच्यासह अन्य पत्रकारांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, छायाचित्रकार यांनाही पुरस्कार जाहीर झाले असून, या पुरस्काराची घोषणा अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी बुधवार ( 4 नोव्हेंबर) ला केली आहे.
पत्रकार दिनी शुक्रवार 6 जानेवारीला पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे , खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक राकेश ओला, महापौर रोहीणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.
नवनीतभाई बार्शीकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- सुधीर लंके, स्व. दा. प. आपटे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- मिलींद देखणे, स्व. जनुभाऊ काणे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- विठ्ठल लांडगे, स्व. आचार्य गुंदेचा स्मृती पत्रकारीता पुरस्कार- राजेंद्र झोंड, सुधीर मेहता स्मृती पत्रकारीता पुरस्कार- नंदकुमार सातपुते, नंदकुमार सोनार स्मृती पत्रकारीता पुरस्कार- महेश देशपांडे महाराज, स्व. प्रकाश भंडारे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- रियाज शेख , स्व. प्रकाश सावेडकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- दिपक मेढे, स्व. पांडुरंग रायकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- सुनील भोंगळ, जितेंद्र आगरवाल स्मृती पत्रकारीता पुरस्कार- दत्ता इंगळे (छायाचित्रकार), स्व. रमाकांत बर्डे स्मृती पत्रकारीता पुरस्कार - प्र. के. कुलकर्णी, स्व. श्रीपाद मिरीकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- नरहर कोरडे यांना जाहीर झाले आहेत.
‘उत्कृष्ट पत्रकारीता’ दिव्य मराठीचे रिपोर्टर बंडू पवार यांच्याबरोबरच पत्रकार अरुण नवथर, अण्णासाहेब नवथर, ज्ञानेश दुधाडे,गोरख शिंदे , अशोक सोनवणे , जयंत कुलकर्णी, सुर्यकांत नेटके, सुर्यकांत वरकड, रामदास ढमाले, अशोक झोटींग, करण नवले, दिलीप वाघमारे, सुरेश वाडेकर, निशांत दातीर, सुनील हारदे, सुहास देशपांडे , मनोज मोतीयानी, रमेश देशपांडे, सुभाष चिंधे , राम नळकांडे, आबीद खान, गजेंद्र राशीनकर, विजय सांगळे, पप्पू जहागीरदार यांना जाहीर झाले आहेत.
व्हिडिओग्राफी द्वारे उत्कृष्ट बातमीदारी केल्याबद्दल निलेश आगरकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पत्रकार अनिल पाटील यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.