आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपातही रुग्णसेवा सुरळीत:परिचारिका संपावर, जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली रुग्णांना वैद्यकीय सेवा

अहमदनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपाला पाठिंबा मात्र वैद्यकीय अधिकारी हजर; संपातही रुग्णसेवा राहिली सुरळीत

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू झालेल्या बेमुदत संपात जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारीका व अन्य कर्मचारी सहभागी झाल्यानंतरही जिल्ह्यात रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याचे सकारात्मक चित्र मंगळवारी पहायला मिळाले. परिचारिका संपात सहभागी असतानाही रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतः वैद्यकीय सेवा रुग्णांना दिली.

परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका तसेच अन्य तालुक्याच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील नर्सेस व परिचारिका सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाल्या होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

परिचारिका संघटनेच्या वतीने अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चादेखील काढण्यात आला होता. संपादरम्यान वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नये सर्वसामान्य रुग्णांना रुग्णसेवा मिळावी या हेतूने जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ.श्रीकांत पाठक, डॉ. संदीप कोकरे, डॉ. प्रशांत तांदळे, डॉ. सचिन सोलट, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. अरुण सोनवणे, डॉ.विक्रम पानसंबळ यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वैद्यकीय सेवा दिली.

बाह्य कक्ष सुरू

जिल्हा रुग्णालयात संपाच्या पार्श्वभूमीवर परिचारिका सेवेत नव्हत्या. मात्र, अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीची सेवा म्हणून केस पेपर व अन्य बाह्य रुग्ण कक्ष सुरूच ठेवले होते. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना उपचार व वैद्यकीय सेवा मिळाली.

संपाला पाठिंबा पण..

जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाला आमचा पाठिंबा आहे मात्र आम्ही या संपात सहभागी होऊ शकत नाही. आज सकाळपासूनच जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येत होते. त्यांच्यावर नियमितपणे उपचार व औषधे देण्यात आली त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा ठप्प झाली नाही असे डॉ. मनोज घुगे यांनी सांगितले.

यापूर्वी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची ओपीडी फुल्ल झाल्यामुळे रुग्णांची हेळसांड झाल्याचे समोर आले होते.त्यामध्ये पत्नीच्या हातात सलाईनची बाटली देत रुग्णाला उपचारासाठी वाट पाहण्याची वेळ आली होती. असे पुन्हा होण्याची शक्यता असताना असे झाले नाही. परिचारीका संपावर असतानाही वैद्यकीय सुविधेत कोणतीही तडजोड झाली नाही. संबंधित वृत्त

अहमदनगर रुग्णालयात ओपीडी फुल्ल:पत्नीच्या हातात सलाईनची बाटली देत उपचारासाठी दाखल; परिचारिका नसल्याने हेळसांड

​​​​​​​

​​​​​​​शासकीय रुग्णालयात एक रुग्ण चक्क पत्नीच्या हातात सलाईची बाटली देऊन पायी चालत उपचारासाठी कक्षात दाखल झाला होता.वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...