आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक शनिवारी, ६ मे राेजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते व किटकनाशके याबाबत कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे.
भरारी पथके कार्यरत
खरीप हंगाम २०२३- २४ साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. शेतकऱ्यांची कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत केली आहेत.
फसवणूकीला घालणार लगाम
भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. बोगस निविष्ठा व जादा दराने निविष्ठांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल.
जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत करण्यात आलेली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.