आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव:नगरमधील शेवगावमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक, पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघे गंभीर जखमी, घटनेनंतर शहर कडकडीत बंद

प्रतिनिधी | अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगावमध्ये रात्री दोन गट आमने-सामने आले होते. त्यावेळची ही दृश्य आहेत. - Divya Marathi
शेवगावमध्ये रात्री दोन गट आमने-सामने आले होते. त्यावेळची ही दृश्य आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये रविवारी (ता. 14) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात पोलिस कर्मचाऱ्यांसह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 32 जणांना ताब्यात घेतले आहे. तर, 112 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके झाले काय?

शेवगाव शहरात रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मेरी रोड मार्गे शेवगाव शहरातील मुख्य एसटी स्टँड चौकात आली. तिथून पुढे ही मिरवणुकी जात असताना डीजेवरून दोन गटात तुफान राडा झाला. रात्री आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनूसार, सुरूवातीला एका गटातील एकाने दगड भिरकावला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानेही दगडफेक सुरू केली. दोन्ही गटांच्या आक्रमकपणामुळे घटनास्थळी नंतर तुफान दगडफेक झाली. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

शेवगाव शहरात कडकडीत बंद

दगडफेक सुरू असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यादरम्यान 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले. तसेच, दोन युवकही गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर सोमवारी शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ग्रामीण भागातून खरेदीसाठी शेवगावात आलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

रस्त्यावर दगड, विटांचा खच

रात्री दोन गटातील हाणामारीच्या घटनेनंतर अज्ञात जमावाने शहरातील विविध दुकानांवर व फलकांवर दगडफेक केली. त्यामुळे रस्त्यावर दगड, विटांचा व फरशांचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला पथकासह रात्रीच शेवगाव शहरात दाखल झाले होते. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

तणावामुळे व्यवहार ठप्प, बाजारपेठेत शुकशुकाट

हाणामारी व वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहिल्याच दिवशी शेवगाव शहर बंद ठेवण्यात आले असून बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेवगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातून खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत असून, एसटी बसेस देखील काही प्रमाणात बंद होत्या. त्यामुळे नगरसह राज्याच्या अन्य भागात जाणाऱ्या प्रवाशांचे देखील मोठे हाल झाले.

पाहा घटनेनंतरचे PHOTOS...

दगडफेक करणाऱ्या काही युवकांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.
दगडफेक करणाऱ्या काही युवकांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.
दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दगडफेकीमुळे आसपासच्या इमारतीच्या काचा फुटल्या.
दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दगडफेकीमुळे आसपासच्या इमारतीच्या काचा फुटल्या.
घटनेनंतर सोमवारी सकाळी शेवगाव शहरातील जवळपास सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
घटनेनंतर सोमवारी सकाळी शेवगाव शहरातील जवळपास सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
उपद्रवी गटांनी रस्त्यावरील वाहनांनाही लक्ष्य करत त्यांची तोडफोड केली.
उपद्रवी गटांनी रस्त्यावरील वाहनांनाही लक्ष्य करत त्यांची तोडफोड केली.

एका दिवसापूर्वी अकोल शहरात दोन गटांत दंगल

अकोल शहरातील दंगलीला 24 तास उलटत नाही तोच शेवगावमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. अकोला शहरातील जुने शहर पोलिस ठाण्याअंतर्गत दोन गटांमध्ये रात्री दंगल उसळली. या दंगलीत रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे दगडफेकही सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पोलिस दंगल नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत होते. या दगडफेकीत काही नागरिकही जखमी झाले.

संबंधित वृत्त

अकोल्यातील दंगल पूर्वनियोजीत होती? : दंगलग्रस्तांनी सांगितली आपबीती; दंगलखोरांनी पिशवीत दगड आणले होते, हाती शस्त्रे; दार बंद केल्याने बचावलो

दंगलखाेरांनी साेबत दगड आणले होते. हातात शस्त्रे होती. फटाके फाेडत इंधनाचे कापडी बाेळे फेकले. मुख्य दाराला लाथा मारल्या.. घराच्या मागील बाजूने घुसण्याचा प्रयत्न केला... मात्र, सुदैवाने यश आले नाही... आम्ही दार बंद करूनच बसलाे... खिडकीच्या फटीतून डाेकावून बाहेर पाहिल्यानंतर बाहेरील हिंसेने थरकाप उडला... अशा शब्दांत जुने शहरातील दंगलग्रस्तांनी आपबीती सांगितली. दंगलखाेरांनी निर्माण केलेली दहशत सांगतांना त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसून येत हाेती. वाचा सविस्तर