आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. गोपीचंद पडळकर यांची मागणी:अहमदनगरचे अहिल्यादेवीनगर नामांतर करावे

शिर्डी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करून लोकभावनेचा आदर करावा, अशी मागणी आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, हिंदू राजमाता अहिल्यादेवी होळकर देशाच्या प्रेरणास्थान आहेत. मोगल, निजामशाही हिंदू संस्कृतीवर हल्ले करून मंदिरे तोडून जमीनदोस्त करत होती, त्या वेळी अहिल्यादेवी यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट बांधले, बारवा बांधल्या, मंदिरांचे पुनर्निर्माण केले. महिलांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यामुळेच आज देशात सांस्कृतिक वैभव टिकून आहे. अहिल्यादेवींची कर्मभूमी अखंड हिंदुस्थान आहे, मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडीतील आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. त्यामुळे अहमदनगरचे नाव बदलून राजमाता अहिल्यादेवीनगर करावे.

बातम्या आणखी आहेत...