आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवी जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. खेळामध्ये आरोग्य सुदृढ राखण्याबरोबरच मानसिक क्षमतांचा विकास करण्याची क्षमता असून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत होण्यासाठी मैदानी खेळ निश्चितच उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी शनिवारी 17 (डिसेंबर) ला केले.
अहमदनगर येथे सामाजिक न्याय विभाग व इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्यावतीने वाडिया पार्क, जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितारणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, सहायक आयुक्त समाज कल्याण राधाकिसन देवढे,जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले, समाज कल्याण विभागाच्या शासकीय आणि खाजगी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची सांघिक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होईल. शालेय व महाविद्यालयीन स्पर्धेंमधून उत्कृष्ट खेळाडू तयार होऊन राज्य पातळीवर आपल्या जिल्ह्याचा या खेळाडूंनी नावलौकिक करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सहायक आयुक्त समाज कल्याण राधाकिसन देवढे, जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती भाग्यश्री बीले, राहूल गांगडे , खुरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ करण्यात झाला.
30 शाळांमधील 1 हजार खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील 30 शाळांमधील 1 हजार खेळाडूंनी भाग घेतला. गटानुसार घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये शालेय गटात 1 ली ते 4 थी, 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 वी व महाविद्यालयीन 11 वी 12 वी असे मुला-मुलींचे स्वतंत्र गट करण्यात आले. सांघिकमध्ये कबड्डी व खो-खो तर वैयक्तीक मध्ये धावणे 100 मीटर व 400 मीटर पोहणे, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, तर छोट्या गटासाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोती उडी असे करमणूकीचे खेळ यावेळी घेण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.