आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासह भारत सरकारच्या नवी दिल्ली येथे झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीची माहिती देण्यासाठी व संघटनेची पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने रविवारी (७ मे) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व ईपीएस ९५ पेन्शनर्सना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दहिफळे व सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे. नेवासा रोड श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल येथे साडेबारा वाजता मेळाव्याला प्रारंभ होणार आहे.
ऑल इंडिया कॉर्डिनेशन समिती ऑफ ईपीएफ पेन्शन असोसिएशनचे निमंत्रक कॉ. अतुल दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बर्याचशा पेन्शन धारकांनी पेन्शन वाढीचे फॉर्म भरून दिले आहेत. काहींनी ऑनलाइन भरले आहेत, तर काहींचे ऑनलाइन झालेले नाही. त्यानुसार काही पेन्शन धारकांना सहाय्यक आयुक्त भविष्य निर्वाह निधी कार्यालय नाशिक यांच्याकडून लेखी पत्रही आले आहेत. त्यावरील सविस्तर चर्चा करून पुढील माहिती देण्यात येणार आहे.
पेन्शनधारकांना किमान ९ हजार व महागाई भत्ता मिळावा यासाठी पुढील आंदोलनाची दिशा या मेळाव्यात ठरविण्यात येणार आहे. गेली दहा ते बारा वर्षे प्रयत्न करूनही अद्याप पेन्शन वाढ झाली नाही, त्यामुळे येत्या २०२४ च्या निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी? यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.