आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व महिला बालकल्याण विभागाकडून 2018 ते 2023 या कालावधीत खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी करावी, यासह अन्य मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यासह आढळगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच व ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांच्या नेतृत्वाखाली आढळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच अनुराधा ठवाळ, गोपीनाथ दांगडे, सुनील पवार, रोहिदास दांगडे, रवींद्र गलांडे, मिलिंद कदम, रावसाहेब दांगडे, ज्ञानदेव शिंदे, बबन भैलुमे, बबन कदम आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.
कामकाजाचे ऑडिट व्हावे
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला अनिल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद समाज कल्याण, महिला बालकल्याण विभागाने खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व चौदा विभागातील सर्व कामकाजाचे ऑडिट व्हावे अशा मागण्या या निवेदनात करण्यात आले आहे.
पदाधिकाऱ्यांना किंमत नाही
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामकाजाची चौकशी करून त्यांची तातडीने बदली करण्यात यावी. येरेकर हे जिल्हा परिषदेत आलेल्या पदाधिकाऱ्यांना किंमत देत नाहीत. असा आरोप ठवाळ यांनी केला.
हे सर्व संशयास्पद
समाज कल्याण समितीने 2021-2022 ला 9 कोटी रुपयांचे क्रीडा साहित्य खरेदी ग्रामपंचायत हद्दीतील नवबौद्ध घटकांना हे साहित्य देण्याचे ठरवण्यात आले होते.साहित्य देखील वाटप झाले मात्र प्रत्यक्षात 199 ग्रामपंचायत कोणत्या दलित वस्तीला हे साहित्य दिले हे सर्व संशयास्पद आहे. अनेक ग्रामपंचायत या दलित वस्ती सोडून निधीचा गैरवापर करत आहेत.
चौकशी व्हावी
आढळगाव येथील मातंग तळई माळ वस्ती येथे पोल बसवण्याचे ठरले होते, निविदा ही मंजूर झाली होती, मात्र हे काम दलित वस्ती सोडून इतरत्र ठिकाणी झाले आहे. असा आरोप ठवाळ यांनी केला. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत काम अंतिम एका संस्थेला देणे गरजेचे असताना अनेक गावांमध्ये उपसंस्था किंवा सब एजन्सी ठेकेदार नेमल्याचे पुढे आले आहे. या प्रकाराची देखील चौकशी व्हावी अशी मागणी ठवाळ यांनी आपल्या भाषणात केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.