आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात गावरान कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून या कांद्याला प्रतिक्विंटल 1 हजार 600 रूपयांचा भाव शनिवारी मिळाला. लाल कांद्याला मात्र, 2 हजार 700 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. कांदा बियाणे कंपन्यांकडून कांदा खरेदी झाल्यास या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील बहुतांश कांद्याचे नुकसान झाले. परंतु, पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत अत्यल्प प्रमाणात खरिपाचा कांदा तग धरून राहिला. मागील वर्षी चाळीत साठवलेला गावरान कांदा अजूनही बाजार समित्यांत आणला जात आहे. परंतु, आठवडाभरापासून दाखल होत असलेल्या लाल कांद्याला 2 हजार 700 चा भाव वांबोरी उपबाजारात मिळाला.
वांबोरीत 13 हजार 737 कांदा गोण्याची आवक झाली होती, एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 205 ते 1 हजार 600 रूपये, दोन नंबर कांदा 805 ते 1 हजार 200 रूपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 800 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 500 ते 800 रूपयांचा भाव मिळाला. अपवादात्मक 28 कांदा गोण्यांना 2 हजार रूपये भाव मिळाला. पाथर्डी तालुक्यातून दाखल झालेल्या 316 गोणी कांद्याला मात्र, 400 ते 2700 पर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कांदा बियाणे कंपन्यांकडून खरेदी झाल्यास, भाव तात्पुरते चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.
बाजरी पुन्हा घसरली
दोन दिवसांपूर्वी भुसार मालाच्या मोंढ्यावर बाजरीला प्रतिक्विंटल 3 हजारांचा भाव मिळाला होता. शनिवारी मात्र, त्यात घसरण होऊन प्रतिक्विंटल 1 हजार 901 रूपये दराने बाजरी विकली गेली. गहू 2301 ते 2402 रूपये तर सोयाबीनला 5201 ते 5451 रूपयांचा भाव मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.