आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध झालेल्या ३६४ कोटी १२ लाख ६८ हजार रूपयांच्या निधीपैकी अखर्चीत राहिलेला २७ कोटी १९ लाख १४ हजार रूपयांचा निधी शासनाला परत पाठवावा लागणार आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत शिल्लक निधीचा आकडा कमी आहे. निधी उपलब्ध असतानाही, सर्वात कमी ५०.५९ टक्के खर्च ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला.
जिल्हा परिषदेला शासनाकडून जिल्हा नियोजन मार्फत २०२१-२२ या वर्षात ३६४ कोटी १२ लाख ६८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला. हा निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत होती. हा निधी मार्च २०२३ अखेर खर्च होणे अपेक्षीत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी विभाग प्रमुखांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, तसेच जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता. त्याप्रमाणे मागील दोन वर्षांच्या तुलनेत खर्चाचा टक्का वाढल्याचे दिसून आले.
नक्की प्रकरण काय?
जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेल्या ३६४ कोटी १२ लाख ६८ हजार रूपयांच्या निधीपैकी ३३६ कोटी ९३ लाख ५४ हजार रूपयांचा निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. शिल्लक राहिलेला सुमारे ८ टक्के निधी शासनाला परत पाठवावा लागणार आहे. शासनाकडून २१ एप्रिलपर्यंत खर्चाला मुदतवाढ मिळाल्यामुळे खर्चाचा टक्का वाढला असला तरी निधी माघारी जाणे, जिल्ह्याला परवडणारे नाही. एकीकडे निधी नसल्याच्या कारणास्तव अनेक कामे रखडतात, तर दुसरीकडे निधी माघारी गेल्यानंतर पुन्हा तो मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींना कसरत करावी लागते. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी प्राप्त निधीच्या तुलनेत ८० टक्के निधी खर्च केला, केवळ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अत्यल्प निधी खर्च केला.
विभागनिहाय खर्च
विभागनिहाय खर्चाची टक्केवारी शिक्षण ९५.५७ टक्के, आरोग्य ८५.२४, महिला व बालकल्याण ८०.८९, कृषी विभाग ९७.४४, लघुपाटबंधारे ९२.७३, ग्रामीण पाणी पुरवठा ५०.५९ टक्के, सार्वजनिक बांधकाम दक्षीण ८९.१७, उत्तर ८४.९४ टक्के, पशुसंवर्धन ९२.४६, ग्रामपंचायत विभाग ९२.५३ टक्के खर्च झाला.
विभागनिहाय खर्चाची टक्केवारी शिक्षण ९५.५७ टक्के, आरोग्य ८५.२४, महिला व बालकल्याण ८०.८९, कृषी विभाग ९७.४४, लघुपाटबंधारे ९२.७३, ग्रामीण पाणी पुरवठा ५०.५९ टक्के, सार्वजनिक बांधकाम दक्षीण ८९.१७, उत्तर ८४.९४ टक्के, पशुसंवर्धन ९२.४६, ग्रामपंचायत विभाग ९२.५३ टक्के खर्च झाला.
५ वर्षांतील अखर्चित निधी (मार्चअखेर) २६.१ कोटी : २०१९ ५२.०७ कोटी : २०२० ३०.९८ कोटी : २०२१ ५४.५७ कोटी : २०२२ २७.१९ कोटी: २०२३
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.