आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरच्या गरुडाने तीन वर्षांनंतर घेतली भरारी:गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर गरुडशिल्पाच्या फिरण्याची चाचणी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे 23 फूट उंचीचा बेस, त्यावर त्याहून अधिक उंचीचा भरारी घेणारा गरूड, असे 51 फूट उंचीचे गरूड शिल्प नेप्ती चौकात ऑगस्ट 2019 मध्ये बसवण्यात आले. या गरूड शिल्पाला अखेर तीन वर्षानंतर फिरण्याचा मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी रात्री या गरूड शिल्पाची फिरण्याची चाचणी घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या शिल्पाला फिरण्याचा मुहूर्त मिळाल्याची चर्चा परिसरात होती.

चौक सुशोभीकरणांतर्गत खासगीकरणातून करण्यात आलेल्या या कामातील शिल्प बसवण्यात आले. चौकातील हे भव्य शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेते. हे शिल्प फिरत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. शुक्रवारी रात्री या शिल्पाची फिरण्याची चाचणी घेण्यात आली.

फायबरसदृश्य साहित्याचा वापर

महापालिकेने खासगीकरणातून चौक सुशोभीकरणाची परवानगी दिल्यानंतर गेले वर्षभर याचे काम सुरू होते. 'कल्पतरू'चे गौरव फिरोदिया यांच्या सहकार्यातून हे शिल्प साकारले आहे. शुभंकर कांबळे यांनी हे शिल्प तयार केले आहे. यासाठी फायबरसदृश्य साहित्य वापरले आहे. सुमारे 20 ते 25 वर्षे हे शिल्प, ऊन, वारा, पाऊस यात तग धरून राहणार आहे. यासाठी 23 फुटांचा बेस उभारण्यात आला आहे. त्यावर भरारी घेणारा गरूड आहे. जमिनीपासून पंखाच्या टोकापर्यंतची उंची सुमारे 51 फूट आहे.

नागरिक कुतूहलाने पाहतात

नगरच्या स्टुडिओमध्ये हे शिल्प तयार करण्यात आले. वर्षभर त्याचे काम सुरू होते. वाहतुकीला अडथळा ठरणार नाही आणि सुरक्षेची काळजी घेत शिल्प बसवण्यात आले आहे. एखाद्या चौकातील एवढ्या उंचीचे हे पहिलेच शिल्प आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिक कुतूहलाने पाहतात.

शिल्पाची भव्यता

भरारी घेणाऱ्या गरुडाचे शिल्प बसवण्यामागे नागरिकांना प्रेरणा मि‌ळावी हा एक उद्देश आहे. नगरच्या मागासलेपणाची चर्चा नेहमी होते. ही मरग‌ळ झटकून गरुडाप्रमाणे भरारी घेण्यास शहराने सज्ज व्हावे, असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. शिल्पाची भव्यता मनाला उभारी देणारी ठरते.

बातम्या आणखी आहेत...